गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला सुनावले

मुंबई, २९ मे : स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटीप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मात्र स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासासाठी राज्यांनीच खर्च केल्याचं खुद्द केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीच सर्वोच्च न्यायालयाला सांगतिलं आहे. आणि तुषार मेहता यांच्या या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही महाराष्ट्र भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपा आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे, हा महाराष्ट्र द्रोह आणि महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजला सुनावले आहे.
राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलंय. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट आहे, असं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटल्याचं आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून निदर्शनास आणलंय. मुंबई व महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली असल्याचं सांगताना त्यांनी नीती आयोग व आयसीएमआरचे दाखलेही दिले आहेत. तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्र सरकारनं केल्याच्या दावाही आव्हाड यांनी खोडून काढला आहे. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारने दिले, असं खुद्द केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याचं आव्हाड यांनी एका वृत्ताचा हवाला देऊन म्हटलं आहे.
News English Summary: The ruling party and the opposition have been at loggerheads over the issue of train tickets for migrant workers. However, Tushar Mehta, the Advocate General of the Center, has told the Supreme Court that the states have paid for the migration of migrant workers. And citing Tushar Mehta’s argument, state housing minister Jitendra Awhad also slammed the Maharashtra BJP.
News English Title: Minister Jitendra Awhad slam to Maharashtra BJP News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER