4 May 2025 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरतंय ‘डेक्सामेथासोन’ औषध....सविस्तर

Doses of dexamethasone, help fight corona, Covid 19 Vaccine

नवी दिल्ली, १६ जून: डॉक्टरांना कोरोना विषाणूवरच्या उपचारांसाठी प्रभावी औषधाची माहिती मिळाली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे. या औषधाच्या मदतीनं कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.

Dexamethasone असे या औषधाचे नाव आहे. ब्रिटनमधील तज्ज्ञ म्हणतात की, हे एक मोठे यश आहे. डेक्सामेथासोन या औषधाचे डोस कोरोनाशी लढायला मदत करतात. चाचणीदरम्यान असे आढळले की, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना हे औषध दिल्यास मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी झाला आहे. ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना या औषधाचा अधिक फायदा होतो. ज्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा आवश्यक आहे, अशा रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो.

कोरोना विषाणूच्या २० रुग्णांना डेक्सामेथासोन औषध देण्यात आले. यापैकी १९ जणांना रुग्णालयात येण्याची गरजच लागली नाही. आणि ते घरीच बरे झाले. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल झालेल्या अतिजोखमीच्या रुग्णांनाही याचा फायदा झाला.

या औषधाचा वापर करून हा धोका कमी करता येऊ शकतो. जगातील सर्वात मोठ्या चाचण्यांमध्येही डेक्सामेथासोन औषधाचा समावेश करण्यात आलेला आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, जर आधी हे औषध ब्रिटनमध्ये उपलब्ध असते तर कोरोनापासून ५००० लोक वाचू शकले असते, कारण हे औषध देखील स्वस्त आहे.

त्यामुळे जगातील बहुतांश देशांना त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरसवर अखेर प्रभावी ठरणारे एक औषध शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. या औषधाचा वापर करुन करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोनचा कमी प्रमाणात डोस देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. रॉयटर्सने देखील याबाबत वृत्त दिले आहे.

 

News English Summary: The name of this medicine is Dexamethasone. Experts in Britain say this is a great achievement. Doses of dexamethasone help fight corona. During the trial, it was found that giving the drug to patients on a ventilator reduced the risk of death by a third.

News English Title: Research says Doses of dexamethasone help fight corona News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या