3 May 2025 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

अमित ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडलासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली

Amit Thackeray, Governor Bhagat Singh Koshyari, Asha Swayamsevaks

मुंबई, २२ जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले होते.

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दुपारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाय योजना बाबत उदासीनता विषयांवर चर्चा केली. तसंच आशा स्वयंसेविकांना सोयी सुविधा मिळाव्यात, राज्य सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी निवदेनातून राज्यपालांकडे केली.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात डॉक्टर, निवासी डॉक्टर, पोलीस इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची आणि रुग्णांची सेवा करत आहेत. दरम्यान, ‘कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या अंतिमवर्ष परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडलासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, वैद्यकीय आणीबाणीच्या सध्याच्या काळात निवासी डॉक्टरांवर कोणताही अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. त्यासंदर्भात या निवासी डॉक्टरांनीच सुचवलेला पर्याय मी माझ्या पत्रासोबत जोडत आहे. त्यांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य तो निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती राज्यपाल यांना मनसे कडून करण्यात आली आहे.

 

News English Summary: MNS president Raj Thackeray’s Chiranjeev Amit Thackeray has become active in politics. After the election of Amit Thackeray as the leader, he is presenting his position on various issues. Amit Thackeray called on Governor Bhagat Singh Koshyari today on the issue of honorarium for Asha Swayamsevaks.

News English Title: Amit Thackeray called on Governor Bhagat Singh Koshyari today on the issue of honorarium for Asha Swayamsevaks News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या