4 May 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राजगृह तोडफोड प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, CM Uddhav Thackeray, Matoshree bunglow

मुंबई, १० जुलै : राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मंगळवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या काचांवर दगडफेक केली गेली आणि कुंड्यांचेही मोठे नुकसान केले गेले. आंबेडकर कुटुंबियांकडून सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात होते आणि त्यानंतर एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि पुढील तपास अद्याप सुरु आहे.

दरम्यान आज वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सलग एक तास चर्चा झाली. राजगृहावरील हल्ला, कोळी, भोईट समाजाच्या मागण्या, अनुसूचित जातींवर झालेले अन्याय अत्याचार या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय राजकीय विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत तपासाबाबत चर्चा झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांकडून तपासाबाबत सुरु आहे. याबद्दल रोज उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणं होत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

त्यानंतर कोळी, भोईट या समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा झाली. बोगस सोसायटी बनवून मच्छीमारांना दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट चुकीचं आहे. हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यावर काहीतरी ठोसं पावलं उचलू असे सांगितले आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात अनुसूचित जातींवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर-मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. तसेच अनेक राजकीय विषयही या बैठकीत उपस्थित केले गेले.

 

News English Summary: Today, Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar called on Chief Minister Uddhav Thackeray. Prakash Ambedkar and the Chief Minister had an hour-long discussion. Discussed three important issues namely attack on Rajgriha, Koli, demands of Bhoit community, injustice done to Scheduled Castes.

News English Title: Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar meet CM Uddhav Thackeray at Matoshree bunglow News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या