29 April 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

पुढील वर्ष साखर उद्योगासाठी धोक्याची घंटा : शरद पवार

बारामती : पुढील वर्षी केंद्र कारकरने साखर उद्योगाला म्हणजे उसाला ठरवून दिलेला देण साखर कारखान्यांना शक्य होणार नसल्याने पुढील वर्ष साखर उद्योगासाठी संकटच राहणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे.

देशभरात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी जगभरात साखर उद्योगाची बाजारपेठ मंदावली आहे त्यामुळे पुढचं वर्ष साखरेला २५०० पर्यंत इतकाच दर मिळेल असं शरद पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. जगातील प्रमुख साखर उत्पादक दशांनी गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेतल्यामुळे साखरेसाठी बाजारपेठ मंदावली आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम साखर उद्योगांना भोगावे लागत असं शरद पवार म्हणाले.

भारतात शेतीविषयक संशोधन आणि शेतकऱ्यांच्या जोरावर भारताने साखर आयात करणारा देश अशी ओळख मिटवून एक साखर निर्यात करणारा देश म्हणून ओळख बनवली आहे. परंतु अशा कठीण परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. बारामतीत एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात शरद पवारांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद केला.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x