1 May 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

महिला सर्वत्र असुरक्षित, त्या बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत - शालिनी ठाकरे

Shalini Thackeray, Covid center

नवी मुंबई, १८ जुलै : नवी मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला होता. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुभम राजेंद्र खातू (वय-25, न्यू पनवेल, भगतवाडी) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कालच क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. आरोपीची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आज संध्याकाळी त्याचा रिपोर्ट येणार आहे.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा ANI’ने केला असून असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संभाव्य म्हणून दाखल झालेल्या एका तरुणीचा एका विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पीडित महिला आणि मुलगा एकाच परिसरात राहत असून मुलाने तिचा विनयभंग करून तिच्या गुप्तांगाशी विकृत चाळे केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सदर प्रकरणाला अनुसरून मनसेने देखील टीका केली आहे.

यावरून मनसे चिपत्रपट सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट करुन म्हटलंय की, पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं. अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा, त्यातूनही तो वाचलाच तर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसचे बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाहीच अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला.

 

News English Summary: A corona positive female patient was raped at the quarantine center in Navi Mumbai. The incident took place at a Navi Mumbai Municipal Corporation quarantine center in Panvel on Thursday night. The incident has caused a stir everywhere.

News English Title: Do not give medical treatment rapist if he survives hang him square MNS aggressive news latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x