7 May 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

ठाणे: रुग्णांवर भरमसाट बिल आकारणाऱ्या खाजगी इस्पितळाचा परवाना रद्द

Thane civic body, Suspends private hospital's licence, Covid 19

ठाणे, २५ जुलै : जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ५२४ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७५ हजार ४४६ वर पोहोचली आहे. तर, दिवभरात ३७ करोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा २ हजार ८३ इतका झाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी दिवसभरात १ हजार ५२४ नवे रुग्ण नोंदले गेले. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ३४२, नवी मुंबईतील ३०८, ठाणे शहरातील २८५, ठाणे ग्रामीणमधील २००, मीरा-भाईंदरमधील १६०, उल्हासनगर शहरातील ९२, बदलापूरमधील ५२, अंबरनाथमधील ५० आणि भिवंडीमधील ३५ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी जिल्ह्य़ात ३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, भिवंडीतील ८, नवी मुंबईतील ५, ठाण्यातील ४, तर अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीणमधील प्रत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात मुंबईपेक्षाही चिंताजानक स्थिती ही डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी करोनाची स्थिती चिंताजनक आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने आणखी काळजी घेण्याची गरज आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ठाण्यातील खाजगी इस्पितळांवर मनमानीला आरोप देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात येतं आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार ठाणे महानगरपालिकेने कोरोना रुग्णांवर अवाजवी बिल आकारणाऱ्या खाजगी इस्पितळाच्या परवाना रद्द केला आहे. त्यामुळे यापुढे अजून काही इस्पितळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: In Maharashtra, the situation is more worrying than in Mumbai. In Dombivali, Thane and Navi Mumbai, the situation is worse. Sharad Pawar has also said that more care needs to be taken in view of the monsoon.

News English Title: Thane civic body in Maharashtra suspends private hospital’s licence News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या