30 April 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

मोठी बातमी | राज्यात आज ११,५१४ नवे कोरोना रुग्ण, ३१६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus, Covid19 Vaccine

मुंबई, ६ ऑगस्ट : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही १० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज ११ हजार ५१४ इतके रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात विक्रमी संख्येनं करोना रुग्णांची नोंद होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढतेच आहे. आज राज्यात तब्बल १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेटही ६५.९४ %वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत एकूण ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण करोनाची लढाई जिंकून घरी सुखरुप परतले आहेत. राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ४६ हजार ३०५ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३७, ७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत ९१० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १ लाख २० हजार १६५ इतकी झाली आहे. यापैकी २० हजार ६५२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ९२ हजार ६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत ६ हजार ६४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७७ टक्के झाला आहे.

 

News English Summary: For the second day in a row, more than 10,000 new patients have been registered in the state. Today 11 thousand 514 patients have been found. Therefore, the total number of patients has become 4 lakh 79 thousand 779. This information has been given by the state health minister Rajesh Tope.

News English Title: 11514 Covid19 Cases 316 Deaths Reported In Maharashtra Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x