शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर कोरोनाचा शिरकाव | पवारांची चाचणी निगेटिव्ह

मुंबई, १७ ऑगस्ट : राज्यातील कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून अनेक राजकीय नेत्यांनाही या व्हायरसने लक्ष्य केलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्व्हर ओकवरील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे. दरम्यान, सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या स्वीय सहाय्यकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे.
सुदैवाने शरद पवार गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आले नव्हते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस शरद पवार यांनी कोणालाही न भेटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांना खडसावल्यामुळे सध्या पवार कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यासाठी पवार कुटुंबीयांच्या भेटीगाठी सुरु आहेत.
कालच शरद पवार बारामतीला जाणार होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अजित पवारांशी त्यांची फोनवर सकारात्मक चर्चा झाल्याने पवारांनी बारामतीला जाणे रद्द केले आणि ते मुंबईला परतल्याचे सांगिते जात आहे.
News English Summary: The number of corona in the state is increasing day by day and many political leaders have also been targeted by the virus. Similarly, it has come to light that a corona was infiltrated on Silver Oak, the residence of NCP President Sharad Pawar in Mumbai. 2 people on Silver Oak have been infected with corona.
News English Title: Sharad Pawar residence in Mumbai Silver Oak 6 security personnel found Covid 19 positive News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL