4 May 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

देशात ९० टक्के रोजगार देणारी असंघटीत यंत्रणाच मोदी सरकारनं नष्ट केली - राहुल गांधी

Congress MP Rahul Gandhi, Employment to the youth

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट: कोरोनाच्या काळात रोजगार ठप्प झाला आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दिवसांमध्ये संकट अजून गहिरं होणार असून तरुणांना रोजगार मिळणं कठीण होणार आहे असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. पुढील सहा ते सात महिन्यांत देशासमोर रोजगार संकट उभं राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोनासंबंधी इशारा दिल्यानंतर मीडियाने आपली खिल्ली उडवली होती अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने एका कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘देशात दोन प्रकारची अर्थव्यवस्था आहे. एक संघटीत अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये मोठमोठया कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसरी असंघटीत अर्थव्यवस्था आहे. ज्यामध्ये छोटे, मध्यम वर्गीय नोकरदार, शेतकरी आणि लाखो लोक आहेत. देशात जवळपास ९० टक्के रोजगार असंघटीत अर्थव्यवस्था देशाला देते. आता ही यंत्रणाच नरेंद्र मोदी सरकारनं नष्ट केली, संपुष्टात आणली’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“भारत तरुणांना नोकरी देण्यात असमर्थ ठरणार आहे. हे स्पष्ट आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. “कोरोनामुळे मोठं नुकसान होईल असं मी सांगितलं असता मीडियाने माझी खिल्ली उडवली. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझं ऐकू नका. मी आज सांगतोय की, भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही. जर तुम्हाला पटत नसेल तर पुढील सहा ते सात महिने वाट पाहा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Rahul Gandhi criticized Prime Minister Narendra Modi’s policies through a virtual press conference. Rahul Gandhi has said that in the next six to seven months, the country will face an employment crisis.

News English Title: Congress Rahul Gandhi says India will not be able to provide employment to the youth News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या