4 May 2025 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा अंदाज | मुंबईत ऑरेंज अलर्ट

Heavy Rain, Mumbai Konkan, Weather Report, K S Hosalikar

मुंबई, २२ ऑगस्ट : मागील काही दिवसांपासून पावसानं मुंबईसह जवळच्या जिल्ह्यांमध्ये मुक्काम ठोकला असून, संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले असताना एक दिवस आधीच अर्थात शुक्रवारपासून मुंबईत पावसानं जोर धरला आहे. मुंबई जोरदार पाऊस सुरू असून, हवामान विभागानं २५ ऑगस्टपर्यंतचा अंदाज जाहीर केला आहे.

२५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून, मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाला सर्तक राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे पावसाचीही दमदार बॅटींग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. हेच एकंदर चित्र पाहता पुढील पाच दिवसही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होशाळीकर यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. ज्यामध्ये २५ ऑगस्टपर्यंतच्या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमानाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील प्रशासकीय यंत्रणांनाही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

News English Summary: According to the IMD warning, Mumbai, Palghar, Thane, Raigad, and Ratnagiri districts may receive heavy to very heavy rainfall today, dampening the festive spirits. Further, a yellow alert has also been issued for Mumbai and Thane for Sunday, with orange alert for Palghar, Raigad and Ratnagiri.

News English Title: Heavy Rain Predicted In Mumbai Konkan And Some Parts Of Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या