10 May 2025 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

आम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली

Shivsena MP Sanjay Raut,  BJP NNDA, Akali Dal, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर : शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

“शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “टीडीपीचं काही नक्की नसतं, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने, जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नितीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचं उद्याचं काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत”.

“आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. “एनडीएत कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरं झालं असत,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर लागलीच हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत हमी करार व कृषीसेवा या दोन विधेयकावरील चर्चेदरम्यान सुखबीर सिंग बादल यांनी या विधेयकांना कडाडून विरोध करताना सांगितले की, शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे. कृषीसंबंधित या प्रस्तावित कायद्याने कृषिक्षेत्रासाठी पंजाबमधील सलग सरकारने ५० वर्षे केलेल्या कठोर मेहनतीवर पाणी फेरले जाईल.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has said that NDA was disrupted only when Shiv Sena came out. He also said that the NDA and the BJP were not on close terms. Shiromani Akali Dal leader Harsimrat Kaur has resigned as Union Minister in protest of the Agriculture Bill.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut On BJP Nda Akali Dal Farmer Bill Lok Sabha Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या