बेंगळुरूः भाजप, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांचे अंतिम निकाल आणि आकडेवारी हाती आली असली तरी एकूणच सत्ता स्थापनेत महत्वाचा दुआ असतात ते त्या संबंधित राज्याचे राज्यपाल. सर्वच पक्ष बहुमताचा दावा करत असले तरी तो सिद्ध करण्याची पहिली संधी कोणाला द्यावी हे राज्यपाल ठरवत असतात.
एकूणच सर्वच पक्षांचे सत्ता सत्तास्थापनेचे दावे प्रतिदावे हे कर्नाटकच्या राज्यपालांच्या दरबारी आले आहेत. त्यात भाजपने सर्व प्रथम राज्यपालांची भेट घेत आपल्याकडे आमदारांचे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. परंतु कर्नाटकात चर्चा रंगली आहे ती कर्नाटकच्या राज्यपालांच्या राजकीय प्रवासाची.
कारण राज्यपाल वजुभाई वाला हे भाजपचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वजुभाई वाला हे गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. वजुभाई वाला सतत ९ वर्षं गुजरातमधील नरेंद्र मोदी सरकारचे अर्थमंत्री होते. तसेच ते नरेंद्र मोदींचे सर्वात विश्वासू म्हणून भाजप मध्ये परिचित आहेत. कारण २००१ मध्ये त्यांनी आपला विधानसभा मतदारसंघ नरेंद्र मोदींसाठी सोडला होता.
त्यामुळे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान होताच सप्टेंबर २०१४ मध्ये वजुभाईंची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. त्यामुळे कर्नाटक खरी चर्चा ही रंगली आहे कि, खरे किंगमेकर जनता दल सेक्लुलर आहेत की राज्यपाल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शेवटचे निकाल हाती येई पर्यंत भाजपच्या तोंडा जवळ आलेला घास निघून गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वात सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्याची संधी राज्यपाल वजुभाई वाला कोणाला देतात ते पाहावं लागेल.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		