1 May 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

भाजपशासित राज्यांमध्ये छटपुजा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध | भाजप नेत्यांना माहित नाही

Congress spokesperson Sachin Sawant, BJP MLA Ram Kadam

मुंबई, १८ नोव्हेंबर: कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी छठपूजा साजरी करण्यावर महाराष्ट्र सरकारकडून निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेवर काँग्रसे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.

याबातर ट्विट करताना आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे की, ‘रावणराज चालवणारे मुघलशाही महाविकास आघाडी सरकार हिंदू सणांचा विरोध करणं कधी बंद करणार? अन्य धर्मांच्या सणांना परवानगी देण्यात जशी तप्तरता दाखवता तशीच हिंदू धर्माच्या सणांना का नाही दाखवत? महाविकास आघाडीचे निर्णय इटलीवरुन होतात का?,’ असा बोचरा सवाल राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

‘यालाच म्हणतात स्वत:च्याच हाताने स्वत:च्या तोंडाला काळं फासणं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना हे देखील माहिती नाही भाजपशासित राज्यांमध्येही छटपुजेचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच, आरएसएस इटलीमध्येच स्थापन झाली होती, हे तर ऐतिहासिक सत्य आहे.’ असं ट्विट सचिन सावंत यांनी राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना केलं आहे.

 

News English Summary: The Maharashtra government has decided to impose restrictions on the celebration of Chhath Puja this year in the wake of the Corona disaster. Accordingly, it is strictly forbidden to celebrate this festival on the beach, river bank or lake. Congress spokesperson Sachin Sawant has responded to BJP MLA Ram Kadam’s criticism of the Maharashtra government’s decision.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant has responded to BJP MLA Ram Kadam News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x