2 May 2025 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ | उर्मिलाकडून ट्रॉलर्ससाठी मिरचीचा धूर ?

Shivsena leader Urmila Matondkar, Trolled oppositions, Twitter

मुंबई, ३ डिसेंबर: शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकीय टोलेबाजीला सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधक नेटिझन्सनी त्यांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर उर्मिलाने उलट त्यांचीच मोजक्या शब्दात खिल्ली उडवली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केलेली वक्तव्ये, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील कारभारावर केलेली टीका, याचे व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात येत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. या सर्वावर उर्मिला यांनी शिवसेनेच्या स्टाइलमध्येच प्रत्युत्तर दिले आहे.

उर्मिला यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत ‘झणझणीत’ ट्वीट केलं आहे. ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’, हे गाणे मला खूप आवडते. तुम्हाला काय वाटते?’, असे ट्वीट करत उर्मिला यांनी विरोधक आणि ट्रोलर्सचा खरमरीत समाचार घेतला आहे. उर्मिला यांचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

 

News English Summary: After joining the Shiv Sena, actress Urmila Matondkar is seen getting ready for political maneuvering. After opposition netizens viralized her old videos on social media, Urmila, on the contrary, mocked her in a few words. Urmila Matondkar’s statements while entering the Congress, her criticism of the Shiv Sena’s administration in the Mumbai Municipal Corporation during the Lok Sabha elections, are being viralized by the opposition.

News English Title: Shivsena leader Urmila Matondkar reply to trolled oppositions news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या