हैदराबादचं यश दाखवत फडणवीसांकडून कार्यकर्त्यांचं सांत्वन | दाखवलं एकहाती सत्तेचं गाजर

वाशीम, ५ डिसेंबर : आगामी काळात महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी महाविकास आघाडीने दिली असून, त्याचा पुरेपूर फायदा घेणार असल्याचं मोठं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर शक्यते यश मिळवलं आहे, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद यश दाखवत अप्रत्यक्षरीत्या कार्यकर्त्यांचं सांत्वन केल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभासाठी जात होते. त्यादरम्यान वाशीम इथं आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यासोबत त्यांनी संवाद साधला. आम्ही चार जागा फक्त दूर राहिलो आणि दक्षिणेत देखील आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात आगामी काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, असं देखील फडणवीस संवाद साधताना म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार ही जोडगोळी महाराष्ट्रात रणनीती आखते हे एव्हाना अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे. परंतु आता त्यांच्या रणनीतीचा फायदा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर घेत आहे, मात्र राज्यात त्यांचं तीन अनुभवी पक्षांपुढे काहीच चालत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महाविकास आघाडी सरकार आज पडणार, उद्या पडणार करत एक वर्ष कधी पूर्ण झालं ते भाजप नेत्यांना देखील कळलं नाही आणि त्यात कालच्या निकालानंतर आत्मविश्वास ढासळलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दक्षिणेकडून यशाची उदाहरणं देण्याची वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल.
News English Summary: Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis has made a big statement that the Mahavikas Alliance has given the opportunity to establish one-sided power in Maharashtra in the near future and will take full advantage of it. Devendra Fadnavis indirectly consoled the workers by saying that we have achieved success in the elections held in the graduate and teacher constituencies of the state on our own strength and also in the elections held in Hyderabad.
News English Title: Devendra Fadnavis shows Hyderabad result to hide unsuccess in Maharashtra news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC