कारशेडला बीकेसीतील जागा देऊन बुलेट ट्रेन होऊ न देण्याचा डाव आखला जातोय

मुंबई, १८ डिसेंबर: कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी केली. कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडची (Mumbai Metro 3 Car shed) जागा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला (BKC) हलवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपुरात बोलत होते.
त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं आहे. “मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकाराच मोठा” असं म्हणत आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे. तसेच वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा देऊन बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मेट्रोला गिरगावात विरोध केला
मग समृद्धी महामार्ग,कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर..प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच!
आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून
बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय. 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 18, 2020
News English Summary: BJP MLA Ashish Shelar has also taken notice of Chief Minister Uddhav Thackeray and Aditya Thackeray. “The ego of an arrogant king and a luxurious prince is bigger than every development project of Mumbaikars,” said Ashish Shelar. Shelar has also alleged that Mumbai’s development projects have been stifled by personal ego. He also said that instead of setting up a metro car shed, a plot is being hatched to give this car shed space in BKC so that it does not become a bullet train. Ashish Shelar tweeted about this from his Twitter account.
News English Title: BJP MLA Ashish Shelar criticized Thackeray government over BKC plot for Metro 3 Car Shed news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN