3 May 2025 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत | पुण्यात ५ कोटींची खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

FIR registered, BJP leader Girish Mahajan

मुंबई, ५ जेनेवारी: भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तत्पूर्वी गिरीश महाजन यांच्या यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराबद्दल ८ डिसेंबरला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला होता. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत जबर मारहाण केली होती. त्याच दरम्यान व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. जवळपास ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतर देखील भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर, मध्यंतरी भोईटे गटाला तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

 

News English Summary: The BJP leader and former minister Girish Mahajan has been exacerbated. A case has been registered against Girish Mahajan at the Kothrud police station for allegedly beating up the director of Jalgaon District Vidya Prasarak Mandal and demanding ransom from him.

News English Title: FIR registered against BJP leader Girish Mahajan News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या