3 May 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
x

प्रचार केला तात्यांचा आणि पद्म पुरस्कार आबांना | कोणी लगावला टोला?...

Union government, Padma Award, Republic Day

नवी दिल्ली, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (२५ जानेवारी) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ७ जणांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. १० नामवंत व्यक्तींना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७ नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत २९ महिला, १० विदेशातील नागरिक तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. एकूण १६ महान व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्म विभूषण:
1. शिंजो आबे, सार्वजनिक क्षेत्र, जापान
2. एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), कला, तामिळनाडू
3. डॉ. बेल्ले मोनाप्पा हेगडे, औषननिर्माण, कर्नाटक
4. नरेंद्र सिंग कंपनी (मरणोत्तर), विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
5. मौलाना वहिदुद्दीन खान, अध्यात्म, दिल्ली
6. बी. बी. लाल, पुरातत्व, दिल्ली
7. सुदर्शन साहू, कला, ओडीशा

दरम्यान, याच विषयाला अनुसरून मोदी सरकारवर टीका सुद्धा सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन इव्हेंटच्या मार्फत जोरदार प्रचार केला होता. त्याची मैत्री जगभर प्रसिद्ध झाली होती. मात्र अमेरिकेत राजकीय उलथापालट झाली आणि ट्रम्प पायउतार झाले. त्यानंतर मोदींना बुलेट ट्रेन संबंधित मैत्री पुढे करून जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार दिला का अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यालाच अनुसरून ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी ट्विट करत अप्रत्यक्ष टोला लगावताना म्हटलं आहे की, “प्रचार केला तात्यांचा आणि पद्म पुरस्कार आबांना !.”

 

News English Summary: Prime Minister Modi had strongly campaigned for former US President Donald Trump through two events. His friendship was known all over the world. But there was a political upheaval in the United States and Trump stepped down. After that, the discussion started on whether Modi gave the Padma Vibhushan award to former Prime Minister of Japan Shinzo Abe by extending the friendship related to bullet train. According to him, senior journalist Dr. Vijay Chormare tweeted an indirect toll, saying, “Preached Tatya and Padma Award to Abba!”

News English Title: Union government declared Padma Award on Republic Day news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या