3 May 2025 10:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राजीनामा दिला तर आहे, मात्र तो स्वीकारला आहे की नाही हे माहिती नाही

Devendra Fadnavis, Sanjay Rathod, resignation

मुंबई, २८ फेब्रुवारी: पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आले होते, त्याच दिवशी राजीनामा दिला पाहिजे होता. संजय राठोड यांच्या विरोधामध्ये एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून ते राहायला नको होते. राजीनामा दिला तर आहे मात्र तो स्वीकारला आहे की नाही हे माहिती नाही, तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही, अशा शब्दांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

वास्तविक पहिल्याच दिवशी प्रकरण पुढं आल्यावर राजीनामा घ्यायला हवा होता. संजय राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तत्पूर्वी राठोडांवर कारवाई न केल्यास अधिवेशनाचं कामकाज चालवू देणार नाही, असा इशारा विरोधीपक्ष असलेल्या भाजपानं दिला होता. उद्यापासून अधिवेशन सुरू होतं असून, आज (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संजय राठोड हे पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. यावेळी चर्चा झाली.

 

News English Summary: The case came out on the first day, he should have resigned on the same day. He did not want to remain as a minister when there was so much evidence against Sanjay Rathore. If he resigns, it is not known whether he has accepted it or not. We do not know whether he will accept it or not, said Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Assembly.

News English Title: Devendra Fadnavis not sure about Sanjay Rathod resignation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या