29 April 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू | खा. रामस्वरूप शर्मा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले

BJP Himachal Pradesh, MP Ramswarup Sharma, Found died

नवी दिल्ली, १७ मार्च: राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फासावर लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. अद्याप मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.

रामस्वरुप शर्मा हे सध्या दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये सध्या राहत होते. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. एका महत्त्वाच्या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. काँग्रेस उमेदवार आश्रय शर्मा यांना त्यांनी जवळपास 4 लाख मतांनी हरवले होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.३० वाजता त्यांना गोमती अपार्टमेंटमध्ये खासदार रामस्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची खबर मिळाली. पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे. दरम्यान, शर्मा यांच्या मृत्यूमुळे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

 

News English Summary: BJP’s Mandi, Himachal Pradesh MP Ramswarup Sharma has died in the capital Delhi. His body was found this morning at the MP’s residence in Gomati. According to police, his body was found hanging from the gallows. The cause of death has not yet been determined.

News English Title: BJP Himachal Pradesh MP Ramswarup Sharma has died in the capital Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x