लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुंबई, ०२ एप्रिल: कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमुळे सिनेक्षेत्रातलाही मोठ्या प्रमाणात लाॅकडाऊनचा फटका बसला होता. जानेवारी उजाडला तरी राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडली नव्हती. त्यानंतर अभिनेत्यांनी विविध माध्यमातून मागणी केल्यानंतर सरकारने ५०% क्षमतेने सिनेमागृहे चालू केली होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येईल अशी चिंता कलाकारांना सतावत आहे. त्यामुळे मराठी अभिनेता भरत जाधव यांनी लाॅकडाऊन न करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असं त्यांनी म्हटलं आहे.
मागील वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असं संकट कोसळू नये. नाटक आज पुर्णपणे सावरलं नाही. अशात पुन्हा त्याचा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेलं. त्याचा थेट परिणाम आमच्या उपजिवीकेवर होतो. आता राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे, असं भरत जाधव म्हणाले.
कोरोना प्रसार वाढत असेल तर लाॅकडाऊन करावाच लागेल. जर हा निर्णय घ्यावाच लागलाच तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, अशी माहिती भरत जाधव यांनी दिली आहे.
News English Summary: The first lockdown announced by the Corona also caused a major lockdown in the cinema sector. Although January dawned, cinemas and theaters in the state did not open. After that, the government had started cinemas at 50% capacity after the actors demanded it through various means. But now, again, with the rising incidence of corona, actors are worried that theaters and cinemas will be closed. Therefore, Marathi actor Bharat Jadhav has requested not to do lockdown. “If there is a lockdown, we will be completely out of Kollam,” he said.
News English Title: Marathi actor Bharat Jadhav request to CM Uddhav Thackeray over corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL