12 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Jhimma Movie Teaser | झिम्मा मराठी सिनेमाचा टीझर | 23 एप्रिलला प्रदर्शित होणार

Jhimma teaser, Marathi movie, Release on April

मुंबई, ०८ मार्च: लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर आता हळूहळू जनजीवन स्थिरावत आहे. सिनेसृष्टी देखील पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत ‘झिम्मा’ या आगामी सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. हेमंत ढोमे याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या पोस्टर नंतर आज त्याने टीझर शेअर केला आहे.

झिम्मा सिनेमामध्ये निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिसत आहे. अनेक दिवसांनी थिएटर मध्ये असा एक मल्टी स्टारर सिनेमा प्रदर्शित होत असल्याने त्याबद्दल सहाजिकच उत्सुकता आहे. या सिनेमामध्ये वयाच्या विविध टप्प्यावर असणार्‍या महिला पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये आपलं म्हणणं मांडताना कोणती भूमिका घेत आहेत हे पाहताना अनेकजणी त्यापैकी किमान एका व्यक्तीशी सहाजिकच स्वतःला रिलेट करू शकणार आहेत त्यामुळे हा सिनेमा कोणता संदेश देणार हे पाहण्यासाठी सिनेमा पहावा लागणार आहे.

23 एप्रिल 2021 हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित हा सिनेमा आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे तर चित्रपटाला अमितराज यांचे संगीत आहे. छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

 

News English Summary: After getting relief from the lockdown, life is slowly stabilising. Cineworld is also starting to get back on track. Meanwhile, a teaser of the upcoming movie ‘Jhimma’ has been launched today on the occasion of International Women’s Day. The film is directed by Hemant Dhome. He shared the teaser today after the first poster a few days ago.

News English Title: Jhimma teaser out Marathi movie will release on April 23 2021 news updates.

हॅशटॅग्स

#MarathiMovie(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x