3 May 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

अनिल शिदोरे RRPCL कंपनीच्या सीईओंना भेटल्यानंतर....रामचंद्र भाडेकरांचा गंभीर आरोप

Ramchandra Bhadekar, allegations, MNS leaders Anil Shidore, Nanar Refinery

मुंबई, ०८ मार्च: नाणार प्रकल्पाला विरोध करुनही राजकीय फायदा न मिळाल्यामुळे आता ‘इतर फायदे’ पदरात पाडून घेण्यासाठी मनसेने आपली भूमिका बदलल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेने केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार अविनाश सौंदळकर यांना 2014 पेक्षा कमी मते पडली, पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त 14 गावातून तीन आकडीही मते मिळाली नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तर मनसे नावालाही नव्हती.

त्यामुळे आता नाणार परिसरातील राजकारणाला तिलांजली देऊन समर्थनाची भूमिका घेऊन अन्य काही फायदे होत असतील तर घ्यावेत, अशी मनसेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी केला.

या संघटनेकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कृष्णकुंजवर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेले लोक नाणारचे ग्रामस्थ नसल्याचा दावा करण्यात आला आहे. नाणार प्रकल्पाचे समर्थक आणि RRPCL कंपनीचे अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला मनसेचे नेते अनिल शिदोरे हे RRPCL कंपनीचे सीईओ बालासुब्रमण्यम अशोक व अनिल नागवेकर यांनी भेटले होते.

यानंतर नाणार प्रकल्पाचे समर्थक राज ठाकरे यांना 28 फेब्रुवारीलाच भेटणार होते. पण मुख्यमंत्र्यांना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली, असा आरोप रामचंद्र भडेकर यांनी केला आहे.

 

News English Summary: It has been claimed that the people who went to Krishnakunj to meet Raj Thackeray were not Nanar villagers. Proponents of the Nanar project and RRPCL officials have been trying to contact Raj Thackeray for the past several months. Initially, MNS leader Anil Shidore was met by RRPCL CEO Balasubramaniam Ashok and Anil Nagvekar.

News English Title: Ramchandra Bhadekar made allegations on MNS leaders over Nanar Refinery project news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x