8 May 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

एमआयएम-आंबेडकरांची आघाडी कॉंग्रेसच्या मुळाशी तर भाजपला फलदायी?

पुणे : प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच असदुद्दीन ओवेसीं’च्या एमआयएमशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जर भविष्यात जर ही आघाडी झाल्यास ते भाजपसाठी फलदायी असेल तर काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारी असेल असं दिसत आहे. मुस्लिम समाजाने २०१४ मध्ये एमआयएम’ला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे २०१९ ला मुस्लिम समाज सुद्धा एमआयएम पासून लांब राहू शकतो असं सुद्धा राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

प्रकाश आंबेडकरांच नैतृत्व अकोल्या’पुरतीच मर्यादित असलं तरी भीमा-कोरेगाव दंगलीनंतर परिस्थिती त्यांच्या बाजूने पलटली आहे असा प्रकाश आंबेडकरांचा समज असल्याने त्यांचा आत्मविश्वास सुद्धा दुणावला आहे. परंतु या आघाडीची दुसरी बाजू अशी सुद्धा होऊ शकते की आंबेडकरी जनतेच्या आणि मुस्लिम समाजाच्या हे ध्यानात आले की या आघाडीने भाजपचा थेट फायदा होणार आहे आणि काँग्रेसची मतं घटण्यासाठी कारण ठरणार आहे, तर हा समाज या दोन्ही पक्षांऐवजी थेट काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करू शकतो.

परंतु मुस्लिम समाज आणि आंबेडकरी जनता या दोन्ही पक्षांच्या मागे एकवटल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होऊन काँग्रेसच्या हाती पुन्हा घोर निराशा येऊ शकते. एमआयएम’चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या शक्यतेला दुजोरा दिल्याने या आघाडीची चर्चा राजकीय पटलावर रंगताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची सुद्धा तयारी दर्शविली असली तरी त्यांनी अनेक अटी घातल्याने त्यांच्यासोबतच्या वाटाघाटी लांबत आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाण्याआधी, दोन्ही पक्षांवर दबाव वाढविण्यासाठी ही रणनीती आखात असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x