9 May 2024 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

लॉकडाऊनची भीती | जनरल डब्ब्यांमध्ये एकमेकांवर बसून परप्रांतीय राज्याबाहेर

Fear of lockdown, migrant workers, Maharashtra

मुंबई, ९ एप्रिल: राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. अशातच केंद्र सरकारल महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातला जास्त लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, लॉकडाऊनच्या भीतीने पुन्हा एकदा प्रवासी मजुरांचे पलायन सुरू झाले आहे. हे लोक आपल्या घरी परतत आहेत. मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनपासून यीपी जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. जनरल डब्ब्यांमध्ये तर लोक एकमेकांवर बसून प्रवास करत आहेत. पुणे आणि नागपुरातही हिच परिस्थिती आहे. या ट्रेन सुपर स्प्रेडर बनू शकतात आणि संक्रमणाचा धोका अजून वाढू शकतो. आम्ही मुंबईच्या LTT स्टेशनवर जाऊन जाणून घेतले की, लोकांना कोरोनापेक्षा जास्त भीती लॉकडाऊनची आहे.

LTT स्थानकात गाड्यांच्या सामान्य कोचमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट लोक होते. लोक डब्यात नीट उभेही राहू शकत नव्हते. बहुतेकांचे चेहरे मास्क किंवा कपड्यांनी झाकलेले होते परंतु या परिस्थितीत सोशल डिस्टेंसिंग पालन करणे अशक्य होते. सीट आणि फ्लोरवर जागा मिळाली नाही तर लोक छतावर चादर टाकून बसले. गोरखपूर जात असलेल्या ट्रेनमध्ये तर लोक गेटवर लटकून प्रवास करत होते.

 

News English Summary: Fear of lockdown has once again triggered the exodus of migrant workers. These people are returning to your home. There is no place to set foot in the train going from Lokmanya Tilak Terminus station to YP in Mumbai. In general coaches, people are traveling on top of each other.

News English Title: Fear of lockdown has once again triggered the exodus of migrant workers news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x