4 May 2025 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
x

उत्तराखंडात कोरोना रुग्णांमध्ये 8814% वाढ | हरिद्वारमध्ये 30 साधू संक्रमित | महामंडलेश्वरांचा मृत्यू

Uttarakhand after Kumbh Mela 2021

देहरादून, १६ एप्रिल: उत्तराखंडमध्ये आस्थेच्या महाकुंभदरम्यान आता कोरोनाचा कुंभही सुरु झाला आहे. एका महिन्याच्या आत राज्यात कोरोना रुग्ण सापडण्याच्या वेगात 8814% ची वाढ झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत येथे एका दिवसात केवळ 30-60 लोक कोरोना संक्रमित आढळत होते. आता ही संख्या वाढून 2,000 ते 2,500 झाली आहे. यावरुनच कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. आकड्यांमध्ये एनालिसिस केले तर असे वाटते की, सध्या सुरुवात आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती यापेक्षा जास्त भयावह होऊ शकते.

हरिद्वार कुंभमध्ये जमलेल्या गर्दीचा परिणाम आता दिसत आहे. येथेही 30 साधु-संत कोरोना संक्रमित आढळले आहेत. हा सरकारी आकडा आहे, मात्र संक्रमित साधुंची संध्या यापेक्षआ खूप जास्त असू शकते. आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये जाऊन साधूंची RT-PCR टेस्ट केली जात आहे. 17 एप्रिलपासून टेस्टिंग अजून वाढवली जाईल.

दरम्यान गुरुवारी अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देवदास (65) यांचा मृत्यू झाला. महामंडलेश्वर कोविड तपासणीत संक्रमित आढळले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक दिवसांपासून तापही होता. ते कुंभ मेळ्यातच होते. 12 एप्रिलला महामंडलेश्वर यांची प्रकृती अचानक बिघडली होती, ज्यानंतर त्यांना देहरादूनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातून परतणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेण्याचे काम वर्धा जिल्हा मुख्यालयामार्फत सुरू झाले आहे. पोलिसांनीही कुंभमेळ्यात गेलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून केले आहे. वर्षभरापूर्वी तबलिगींच्या ‘मरकज’मधून परतलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाला जसा खटाटोप करावा लागला होता तशीच स्थिती आता निर्माण झाली आहे. कुंमेळ्यात अनेक रूग्ण सापडले असून देशाची चिंता वाढत आहे.

 

News English Summary: Corona Aquarius has also started in Uttarakhand during the Aastha Mahakumbh. Within a month, the rate of corona patient detection in the state has increased by 8814%. Until February, only 30-60 people a day were found to be infected with corona.

News English Title: Corona cases increased by 8814 in Uttarakhand after Kumbh Mela 2021 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या