7 May 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | कोरोनामुळे तोंडाची चव, वास घेण्याची क्षमता गेली? | पुन्हा मिळवण्यासाठी हे उपाय करा

Corona Pandemic

मुंबई, २५ जून | ‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ ही कोविड -19 ची प्रमुख लक्षणे मानली जात होती. तथापि, आरोग्य तज्ञ असेही म्हणतात की, ही दोन्ही लक्षणे हंगामी फ्लू किंवा सर्दीमध्ये समान प्रमाणात पाहिली जातात. जर आपल्यालाही अशी समस्या येत असेल तर काही गोष्टी या समस्येमध्ये आराम म्हणून कार्य करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही खाण्याच्या गोष्टीमधून ‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ या समस्येवर लवकरच मात करता येते.

संत्री:
व्हिटॅमिन सी ने भरपूर संत्री आपल्या प्रतिकारशक्तीसाठी खूप चांगले आहे. परंतु आपणास माहित आहे का की, यामुळे वास घेण्याची आपली क्षमता देखील सुधारू शकते. लहान मुलांच्या स्मेलच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय जमैकन रेसिपी आहे. काही दिवसांपूर्वी ही रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तथापि, कृपया वापरण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लसूण:
मजबूत अँटी-व्हायरल आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे घटक लसूणमध्ये आढळतात. आयुर्वेद म्हणतात की, लसूणचे फायदेशीर घटक आपल्या इन्फ्लेमेशन समस्या कमी करतात. याचा उपयोग करून माणसाची चव आणि गंध सुधारू शकतो. आपण पाण्यात लवंग आणि लसूण गरम करून याचे सेवन करु शकता. त्यात लिंबाचा रसही घालू शकता.

लाल मिर्ची पावडर:
वास घेण्याची शक्ती कमी झाल्यास लाल मिर्ची फायदेशीर ठरतात. लाल मिर्चीमध्ये उपस्थित असलेल्या कॅप्सॅसिन आपल्या ओलफॅक्ट्री सेंसिस कार्य सुधारवून बंद नाक उघडण्याचे कार्य करतात. हिवाळ्यात त्याचे फायदे आणखी जास्त असतात. ते वापरण्यापूर्वी त्यात एक वाटी पाणी थोडेसे मिक्स करावे.

अजवाइन:
अजवाइन कोल्ड आणि अॅलर्जीशी लढण्यासाठी अतिशय फायदेशीर गोष्ट आहे. हे वास घेण्याची शक्ती सुधारून आपले ओलफॅक्ट्री सेंसिस सुधारते. ‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ यापासून मुक्त होण्यासाठी एक चमचा अजवाइन कोणत्याही कपड्यात बांधून त्याचा वास घ्या. दिवसातून अनेक वेळा हे करा. तुमची समस्या लवकरच दूर होईल.

एरंडेल तेल:
अनेक फायदेशीर घटकांनी समृद्ध, साइनसायटिस वेदना आणि अॅलर्जीसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे. जेव्हा कोरड्या किंवा थंडीमध्ये वास घेण्याची शक्ती कमी होते तेव्हा याचा उपयोग केला जातो. रिकव्हरी कालावधी दरम्यान, आपण लवकरच याचे फायदे पहाल. आपल्या नाकात एरंडेल तेलाचा एक थेंब टाका आणि दीर्घ श्वास घ्या.

आपण वर्षभराहून अधिक काळ जागतिक महामारीचा सामना करत असून, कोविड-19 मुळे होणारी आणि काही वेळा दीर्घ काळ टिकणारी एक गुंतागुंत समोर आली आहे. ही गुंतागुंत आहे, वास घेण्याची क्षमता (“अॅन्सोमिआ”) किंवा चव घेण्याची क्षमता (“अॅगेशिआ”), आणि काही वेळा या दोन्ही क्षमता गमावल्या जातात. अमेरिकेतील एका प्रमुख मासिकाच्या मते, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या जवळजवळ 86% रुग्णांनी वास घेण्याची क्षमता गमावल्याचे सांगितले आहे. इतकीच संख्या तोंडाची चव गेलेल्या रुग्णांचीही आहे. अशी तक्रार असलेले सहा दशलक्षहून अधिक रुग्ण असून ही संख्या वाढतेच आहे. सुदैवाने, चव व वास या क्षमता कमी झालेल्या रुग्णांना अन्न सेवन करण्यास मदत व्हावी, या दृष्टीने डॉक्टर, पोषणतज्ज्ञ व थेरपिस्ट यांच्याकडे आधीच काही उपाय आहेत.

पाककृतींच्या काही विशिष्ट घटकांचा विचार करा, तसेच काही पद्धती करून पाहू आणि त्यानंतर घरी करून पाहण्याची काही उदाहरणे:

1) आंबट:
लोणचे, लिंबू किंवा चिंच अशा एखाद्या आंबट पदार्थाने तुम्ही जेवायला सुरुवात केली तर लाळ ग्रंथींना चालना मिळत असल्याने सिद्ध झाले आहे. यामुळे जेवणातील अन्य चवी तुमच्या चव घेण्याच्या संवेदनांना शोधता येऊ शकतात.

2) उमामी:
जपानीमध्ये उमामीचा शब्दशः अर्थ आहे “स्वादिष्टपणाची झलक”. यास आता पाचवी चव मानले जाते (गोड, आंबट, कडू व खारट यासह). सोय सॉस, लसूण, मिसो, मश्रूम, बटाटे व ट्रफल असे उमामी पदार्थही लाळ ग्रंथींना चालना देतात.

3) तिखट:
अनेक तिखट पदार्थांमध्ये असलेल्या कॅप्सेसिन या घटकामुळे ओलफॅक्टरी (स्मेल) नर्व्हचे व संबंधित ग्रंथींचे कार्य सुधारण्याची क्षमता प्राप्त होते. नाकातील मार्गिकांमध्ये अडथळे आले असतील तर ते दूर करण्यासाठीही यामुळे मदत होते.

4) चॉकलेट:
मस्त! चॉकलेट खाण्यासाठी कोणतेही कारण चालते ना? चव घेण्याची क्षमता राहिली नसेल तर ती परत मिळवण्यासाठी अनेकदा केवळ चॉकलेट उपयुक्त ठरते.

5) स्वरूप:
वर नमूद केल्याप्रमाणे, एका पदार्थामध्ये निरनिराळ्या स्वरूपाचे घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मऊ पदार्थ नको वाटत असतील तर थोडे करकुरित पदार्थ समाविष्ट करा. काही वेळा अन्न पदार्थांपेक्षा पातळ पदार्थ घेणे सोयीचे वाटते (शेक किंवा सूप).

6) तापमान:
अनेक कोविड-19 रुग्णांना गरम किंवा कोमट पदार्थांऐवजी थंड किंवा फ्रोझन पदार्थ बरे वाटतात, असे आढळले आहे. गरम पदार्थ खाण्याचा विचार तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर तो पदार्थ गरम न करता खाण्याचा विचार करा किंवा फ्रुट स्मूदी किंवा कोल्ड सिरप घ्यायचा विचार करा.

7) सातत्य महत्त्वाचे:
हताश न होण्याचा प्रयत्न करा. चव घेण्याच्या संवेदना पुन्हा जागृत व कार्यरत होण्यासाठी सतत प्रयत्न करणे व निरनिराळ्या चवी चाखून बघणे गरजेचे आहे. या आठवड्यात एखादे विशिष्ट अन्न बेचव वाटत असेल तर काही दिवसांनी ते पुन्हा खऊन बघा. ही चव कशी विकसित झाली किंवा बदलली हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल कदाचित

खास रेसिपी ज्यांनी तुम्ही चव परत आणू शकता:
वर नमूद केलेल्या काही पद्धतींचा अवलंब करणाऱ्या विशिष्ट पाककृती आता पाहूया. यामध्ये तीव्र चवी व वास आहेत. त्यांचे स्वरूपही निरनिराळे आहे. त्यामध्ये तुमच्या शरीराच्या आणखी एका संवेदनेचा वापर केला जातो – स्पर्शाची संवेदना. ही संवेदना उत्तमरित्या काम करत असणार आहे. योग्य प्रकारे काम करत असलेल्या संवेदनेचा वापर केला तर अकार्यक्षम झालेल्या बाकी संवेदना पुन्हा मिळवण्यासाठी मदत मिळू शकते.

चिकपी मिसो लेमन नूडल सूप:
(उमामी, आंबट, संमिश्र स्वरूप, कोमट तापमान)

4 व्यक्तींसाठी

साहित्य:
* 1 टी-स्पून ऑलिव्ह ऑइल
* 1 लहान लाल किंवा पांढरा चिरलेला कांदा
* 4 लसणाच्या बारिक चिरलेल्या पाकळ्या
* 5 कप – अंदाजे 1 लिटर व्हेजिटेबल ब्रोथ (आम्ही 5 कप पाणी + 5 टेबलस्पून ब्रोथ पावडर वापरतो)
* 1.5 कप (255 ग्रॅम) शिजवलेले व गाळलेले हरभरे
* ½ कप तुमच्या आवडीचा (न शिजवलेला) पास्ता
* एका लिंबाचा रस
* 2 टेबलस्पून मिसो
* चवीनुसार मीठ, मिरी

कृती:
1. एका मध्यम आकाराच्या भांड्यात मंद आचेवर तेल गरम करा.
2. चिमूटभर मीठ घालून लसूण व कांदा भाजून घ्या. त्यांचा रंग बदलेपर्यंत काही मिनिटे ते शिजवा.
3. ब्रोथ घाला आणि तुमचा ब्रोथ तयार करण्यासाठी 20-30 मिनिटे उकळा.
4. शिजवलेले हरभरे व पास्ता घाला आणि नूडल्स पूर्ण शिजेपर्यंत साधारण 10 मिनिटे शिजवा. आच मंद करा.
5. आता मिसो घाला आणि त्याच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत हलवा.
6. लिंबू पिळून टाका, चवीनुसार मीठ व मिरी घाला.
7. लगेचच सर्व्ह करा. सजवण्यासाठी क्रॅकर्स किंवा तळलेले कांदे वापरा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Home remedies to regain the ability to taste smell lost due to covid 19 health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या