4 May 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

Health First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी

Hormonal acne during pregnancy

मुंबई, १५ जुलै | मासिकपाळीचे दिवस जवळ आले की अनेक स्त्रियांना ते नकोसे वाटते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये होणार्‍या वेदनांमुळे जशी चिडचिड होते तसेच मासिकपाळीच्या दिवसांमध्ये चेहरा निस्तेज होणं, पिंपल्स वाढणं हा त्रास अधिक बळावतो. नेहमीच्या पिंपल्सपेक्षा मासिकपाळीच्या दिवसात हार्मोनल बदलांमुळे वाढणारे पिंपल्स अधिक त्रासदायक असतात. ते त्वचेचे अधिक नुकसान करतात. वाढत्या वयानुसार तारुण्यापासून सुरू झालेला हा पिंपल्सचा त्रास वयासोबत वाढत जातो. परिणामी चेहर्‍याचे अनेक प्रकारे नुकसान होते. (How to prevent from hormonal acne with Ayurveda diet during pregnancy in Marathi news updates)

घरगुती उपायांपासून ते अगदी केमिकल पिल्स, बेंझॉल पेरॉक्साईड, सायक्लिक अ‍ॅसिड या सारख्या महागड्या आणि केमिकलयुक्त पर्यायांचा वापर करूनदेखील पिंपल्सचा त्रास कमी होत नाही. अशावेळी अनेकदा आयुर्वेदीक उपचारांची मदत घेतात. आपण काय खातो यावर आपले सौंदर्य अधिक अवलंबून असते. त्यामुळे मासिकपाळीच्या दिवसात स्त्रियांच्या शरीरात होणार्‍या बदलांमुळे वाढणारी अ‍ॅक्नेची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेले हे आहाराचे पथ्यपाणी नक्की पाळून पहा.

हार्मोनल अ‍ॅक्नेचा त्रास वाढण्यामागे आहार कारणीभूत असू शकतो का ?
आयुर्वेदानुसार, आहाराचा परिणाम निश्चितच सौंदर्यावर दिसून येतो. प्रत्येक व्याधीचे मूळ हे पोटाशी निगडित असते. मासिकपाळीच्या दिवसात हॉर्मॉनल अ‍ॅक्नेचा त्रास हमखास जाणवत असेल तर नक्कीच शरीरात हार्मोनल इन्बॅलन्स असल्याचे संकेत मिळतात. खाण्याच्या चूकीच्या सवयींमुळे हा त्रास अधिक वाढतो. डॉ. भागवती यांच्या सल्ल्यानुसार, काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पचनक्रियेमध्ये बिघाड होतो. मैद्याचे पदार्थ,कॉफी यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात घातक आणि विषारी घटकांचे प्रमाण वाढते. तसेच मसालेदार,खारट,आंबट पदार्थदेखील शरीरात पित्तदोष आणि मेटॅबॉलिक रेटचे असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यामुळे शरीरात हार्मोन्सचेदेखील असंतुलन वाढते. चेहर्‍यावर पिंपल येण्याच्या जागेवरून ओळखा त्यामागील कारण

हार्मोनल अ‍ॅक्नेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काय असावे ?
तुमच्या आहारात फळं,सुकामेवा, भाज्या यांचा समावेश मुबलक असणं गरजेचे आहे. यामुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. डॉ. भागवतींच्या सल्ल्यानुसार, आहारात काय असावे हे जाणून घेण्यासाठी खास डाएट प्लॅन –

फळं:
सफरचंद, केळं, पेर आणि अंजीर

भाज्या:
कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, रताळं,भेंडी, हिरवे वाटाणे

फॅट्स:
खोबरेल तेल ( यामध्ये lauric acid मुबलक असते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघते तसेच हार्मोन्सच्या निर्मितीला चालना मिळते.) व तूप

मसाले:
जिरं, लेमनग्रास, केशर, वेलची,बडीशेप आणि पुदीना

पेय:
बदामाचं दूध, नारळपाणी

काय खाणं टाळाल ?
फळं:
द्राक्षं, चिंच, पिच, आंबट सफरचंद खाणं टाळा.

फॅट्स:
तिळाचं तेल, मक्याचं तेल

भाज्या:
चिली पेपर्स, वांगं,ऑलिव्ह, कच्चा कांदा,मूळा,टोमॅटो,गाजर

मसाले:
मिरच्या, राई, सुंठ,लवंग, लसूण

पेय:
चहा,कॉफी, फिझी ड्रिंक्स, अल्कोहल

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to prevent from hormonal acne with Ayurveda diet in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या