2 May 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

हे शेतकरी नाहीत तर 'मवाली' आहेत | केंद्रीय मंत्र्यांचं आंदोलक शेतकऱ्यांविरोधात संतापजनक विधान

Rakesh Tikait

नवी दिल्ली, 22 जुलै | कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. केंद्र सरकारने आणलेले हे तीन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक चर्चा झाल्या परंतु यावर काही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकारही नरमाई घ्यायला तयार नाहीये. परंतु, 26 जानेवारी रोजी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतर केंद्र सरकारने सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या या प्रदर्शनाला अटींसह मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 22 जुलै ते 9 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 पर्यंत प्रदर्शनासाठी परवानगी असणार आहे. सभागृहात एकीकडे देशाची संसद चालणार आहे तर दुसरीकडे जंतर मंतरवर शेतकऱ्यांची सलग 19 शेतकरी संसद सुरु राहणार आहे.

राकेश टिकैत शेतकऱ्यांसह पोहोचले जंतर-मंतरवर:
भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत हे शेतकऱ्यांसमवेत दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले आहे. यापूर्वी ते सिंधू बॉर्डर असून बसव्दारे ते प्रदर्शन स्थळावर आले. प्रदर्शनात 200 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. आम्ही याव्दारे संसदेतील कार्यवाहीवर लक्ष ठेवणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. त्यामुळे जंतर मंतरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांचं संतापजनक विधान:
दरम्यान या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आजपासून सुरू केलेल्या किसान संसदेबाबत प्रतिक्रिया देताना मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, हे शेतकरी नाहीत तर मवाली आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. या सर्व गुन्हेगारी कारवाया आहेत. २६ जानेवारीला जे काही झाले होते. तेसुद्धा लाजीरवाणे होते. गुन्हेगारी कृत्ये होती. त्यात विरोधी पक्षांकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले गेले. मीनाक्षी लेखींच्या या विधानावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Minister Meenakshi Lekhi called protesting farmers hooligans news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RakeshTikait(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या