28 April 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

भारतात सत्य मांडणाऱ्या वृत्तपत्रावर इन्कम टॅक्स विभागाच्या धाडी | मोदींच्या फोटोसहित अमेरिकेतील वृत्तपत्रात हेडलाईन

Washington Post

नवी दिल्ली, 22 जुलै | दैनिक भास्करवरील आयकर विभागाच्या छाप्याच्या वृत्ताची दखल आता जागतिक दर्जाच्या माध्यमांकडे पोहोचल्या आहे आणि त्यामुळे मोदी सरकारची देखील जगभर निंदा होताना दिसत आहे. संसदेत सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज या प्रकरणामुळे आधीच स्थगित करण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त देताना मोदींचा फोटो वापरल्याने देशाच्या लोकशाहीची मान खाली झुकल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

परदेशी माध्यमांचे म्हणणे आहे की दैनिक भास्कर हे गेल्या काही महिन्यांपासून सामान्य लोकांसाठी महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध करत होते. असे केल्याच्या काही महिन्यांतच भास्कर ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. वॉशिंग्टन पोस्टने इनकम टॅक्स विभागाला विचारले भास्करवर रेड टाकण्याचे कारण तर प्रवक्ताने म्हटले सांगू शकत नाही. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने हेडलाइनमध्ये लिहिले, ‘आवश्यक कव्हरेजच्या काही महिन्यांच्या आतच वृत्तपत्रावर आयकर विभागाने छापा टाकला’

संपूर्ण वृत्त देत वॉशिंग्टन पोस्टने म्हटले:
भारतातील सर्वात प्रमुख वृत्तपत्रावर छाप्याचे कारण म्हणजे, कोरोना काळात केलेले आवश्यक कव्हरेज हे आहे. भारतातील पत्रकार आणि राजकीय व्यक्तीच्या हवाल्याने म्हटले की, सरकारचे सत्य समोर आणल्यानंतर भास्करवर छापा टाकण्यात आला आहे.

वॉशिंग्टन पोस्टने टॅक्स अथॉरिटी प्रवक्ता सुरभि अहलुवालिया यांच्यासोबतही छाप्याविषयी चर्चा केली. परंतु छापा टाकण्याचे कारण विचारले असता त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. वॉशिंग्टन पोस्टने भारतातील आपल्या स्त्रोतांचा हवाला देताना लिहिले आहे – भास्करवरील ही कारवाई सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या कव्हरेजमुळे करण्यात आली आहे. वॉशिंग्टन पोस्टने प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या जबाबालाही जागा दिली आहे. प्रेस क्लबने म्हटले आहे की, अशी कारवाई आणि सरकारी एजेंसींच्या माध्यमातून सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्यांवर हल्ला करते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Top Indian newspaper raided by tax authorities after months of critical coverage said Washington Post news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x