4 May 2025 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

भारतामधील कोरोना महामारीचा अंत जवळ आला | जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांचा अंदाज

WHO scientist Soumya Swaminathan

लंडन, २५ ऑगस्ट | कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून भारतीयांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतामधील कोरोनाच्या स्थितीवरून दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाची स्थिती महामारीवरून (पॅन्डिमिक) एन्डिमिसिटी होत असल्याचा अंदाज डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे. एन्डिमिक अवस्थेत रोग असल्यास नागरिक या रोगासोबत जगण्याचे शिकतात.

भारतामधील कोरोना महामारीचा अंत जवळ आला, जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांचा अंदाज – India covid 19 wave may be entering some kind of stage of endemicity said WHO scientist Soumya Swaminathan :

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची मुलाखत एका ऑनलाईन माध्यमाने घेतली. मुलाखतीत बोलताना डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, की भारताचा विशालता, लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये असलेली प्रतिकारक्षमता लक्षात घेता कोरोनाची स्थिती कमी-जास्त होऊ शकते. आपण संसर्गाचे कमी प्रमाण असलेल्या एन्डिमिसिटीच्या अवस्थेत पोहोचू शकतो. असे असले तरी येत्या काळात कोरोनाच्या संसर्गाचे अत्युच्च प्रमाण दिसणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी आहे, त्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण येत्या काही महिन्यांत अत्युच्च असण्याची शक्यता आहे.

2022 अखेरीस कोरोनाचे लसीकरण हे 70 टक्के होण्याच्या स्थितीत असणार आहे. त्यामुळे देशाची स्थिती सामान्यवत होऊ शकणार आहे. लहान मुलांमधील कोरोनाच्या संसर्गाबाबत विचारले असता पालकांनी काळजी करू नये, असे डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले. सुदैवाने लहान मुलांमध्ये खूप सौम्य आजार होत असल्याचे सिरो सर्व्हेक्षणामधून दिसून आले आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र, रुग्णालयातील बालरुग्णदक्षता विभागासह विविध आरोग्य यंत्रणेने चांगले तयार असणे आवश्यक आहे. हजारो लोक अतिदक्षता विभागात दाखल होतील, अशी आपण चिंता करू नये.

इंग्लंडमधील संसर्गजन्य रोगतज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनीही व्यक्त केले मत:
डॉ. संग्राम पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, की कोरोनाचं संकट संपेल आणि पुढे काहीच कोरोना राहणार नाही, असं होणार नाही. मात्र, कोरोना हा pandemic कडून endemic कडे वाटचाल करेल. दोन्हीमध्ये फरक असा आहे की, pandemic म्हणजे कोरोनाचं हे आलेलं महासंकट. तर endemic म्हणजे तो त्या-त्या भूभागात दीर्घकाळ तिथे राहतो. उदा. टीबी, डेंग्यू, मलेरिया. दरवेळेला वातावरण बदललं की त्याची लागण होते. मात्र, नंतर त्यातून आपण बरे होतो. तसाच कोरोनासुद्धा हळूहळू endemic कडे वाटचाल करेन. तोआता ब्रिटनसारख्या ठिकाणी ती वाटचाल सुरू झाली आहे. इथे मोठ्या प्रमाणात रुग्ण असूनसुद्धा रुग्णालयात रुग्ण दाखल होत नाहीत. कोरोना आता इथे गंभीर स्वरुपात नाही. भविष्यात 100 टक्के कोरोना लसीकरण झाल्यावर समाजातील नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. लोक नेहमीप्रमाणे बाहेर पडतील. नोकरीला जाऊ शकतील. परिस्थिती पूर्ववत होतील. मात्र, त्याला काही महिने किंवा 1-2 वर्ष लागतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: India covid 19 wave may be entering some kind of stage of endemicity said WHO scientist Soumya Swaminathan.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या