6 May 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार, GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे - उदय सामंत

Uday Samant

रत्नागिरी, २७ ऑगस्ट | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते, अशा शब्दात उदय सामंत याांनी राणेंना इशारा दिलाय.

इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार, GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे – Minister Uday Samant target union minister Narayan Rane over Jan Ashirwad Yatra in Konkan :

जन-आशीर्वाद कुणी काढावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितलं असेल. पण आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला मानणारे नेते आहोत. उद्धव साहेबांना मानणारे नेते आहोत. उद्धव साहेब आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. संयम पाळला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने बघितलं आहे, असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावलाय.

टीका जरी पुन्हा सुरू झाली असली तरी प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते. चांगल्या पद्धतीची अॅक्शन झाली तर रिअॅक्शनही तशी असेल, असंही सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात जे दाखल होत आहेत त्यांनी जनतेचा आशीर्वाद घ्यावा. इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार हे त्यांनी सांगावं. GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे, अशी टोलेबाजी सामंतांनी केलीय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Uday Samant target union minister Narayan Rane over Jan Ashirwad Yatra in Konkan.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x