10 May 2025 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईं | दहशतवादी पकडले दिल्लीत अन महाराष्ट्रात पकडल्याचं बरळत आहेत - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

मुंबई १५ सप्टेंबर | एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या टॉपर ताईं | दहशदवादी पकडले दिल्लीत अन महाराष्ट्रात पकडल्याचं बरळत आहेत – NCP leader Rupali Chakankar indirectly criticized BJP leader Chitra Wagh over Delhi Terrorist arrest :

एटीएस प्रमुख काय म्हणाले?
काल तुम्ही दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद बघितली. दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं आहे. त्याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती.” असं अग्रवाल यांनी सांगितलं.

जान शेखने 9 सप्टेंबरला जाण्याचं नियोजित केलं. त्याने 10 तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. तर त्याने 13 तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतलं. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं त्याने तिकीट घेतलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन येणार. तसेच आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू” असंही अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, मुंबई लोकल ट्रेन दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आल्याने भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?” असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे. वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “दिल्ली पोलीस येऊन मुंबईतील आतंकवादी पकडताहेत मग आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का??” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनंतर स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत.

रुपाली चाकणकर यांचं चित्रा वाघ यांना नाव न घेता जोरदार प्रतिउत्तर:
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रद्वेषाने ह्या ताईंना एवढं पछाडलं आहे की हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत. व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी.. उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: NCP leader Rupali Chakankar indirectly criticized BJP leader Chitra Wagh over Delhi Terrorist arrest.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या