भीषण घटना | भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

भोपाळ, २६ सप्टेंबर | मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने महिलेचे काही व्हिडीओ रेकॉर्ड करून जीवे मारण्याची धमकीही दिली. महिला क़ॉन्स्टेबलने पाच जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पीडित महिला कॉन्स्टेबल या नीमचच्या रहिवासी आहेत. सध्या त्या इंदूरमध्ये कार्यरत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
In BJP ruling state Madhya Pradesh woman constable allegedly gang raped and video recording :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर महिला कॉन्स्टेबलची पवन नावाच्या तरुणाशी सुरुवातीला मैत्री झाली आणि पुढे ही मैत्री अधिक घट्ट झाली. एके दिवशी पवनने महिला कॉन्स्टेबलला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केलं. जिथे त्याने अन्य आरोपींसह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान काही व्हिडीओ देखील रेकॉर्ड केले. हे व्हिडीओ दाखवून महिला कॉन्स्टेबलला धमकावलं, तिच्याकडे एक लाख रुपयांचा मागणी केली. तसेच याबाबत तक्रार केली अथवा कोणाला सांगितलं तर जीवे मारू अशी धमकी देखील महिलेला देण्यात आली.
महिला कॉन्स्टेबलने आरोपीच्या छळाला कंटाळून अखेर पोलिसांत याबाबत आता तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आरोपीच्या आईला देखील याची माहिती दिली होती. तेव्हा तिनेही महिलेने धमकी दिली आणि तिने या घटनेबद्दल इतर कोणालाही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं. तसेच आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असा दावाही महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पवन आणि त्याच्या आईला अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Madhya Pradesh three men gangrape woman constable Shoot Video of the Act.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL