3 May 2025 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Special Allowance To Minority Students | शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विभागाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा भत्ता

Special Allowance To Minority Students

मुंबई, १५ ऑक्टोबर | महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० आणि ३५०० रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक (Special Allowance To Minority Students) कल्याणमंत्री नबाब मलिक यांनी हे विशेष भत्ते देण्याचे जाहीर केले आहे.

Special Allowance To Minority Students. The Mahavikas Aghadi Thackeray government in Maharashtra today announced a special allowance of Rs 3,000 and Rs 3,500 per month for minority students. Maharashtra Minority Welfare Minister Nabab Malik has announced these special allowances :

या संदर्भात सविस्तर माहिती देताना नवाब मलिक यांनी म्हटलंय की, “जे अल्पसंख्यांक समूदायाचे विद्यार्थी अल्पसंख्यांक डिपार्टमेंटच्या होस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहात असतील, त्या सर्वांना दरमहा ३००० रूपयांचा भत्ता दिला जाणार आहे. या विशेष भत्त्यासाठीचा सगळा निधी राज्य सरकारचे अल्पसंख्यांक खाते देणार आहे. अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा आणि तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रक्कम ३००० रुपये देण्यात येणार आहेत.

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता ही रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे ट्विट नबाब मलिक यांनी केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Special Allowance To Minority Students of Rs 3000 per month said Minister Nawab Malik.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या