3 May 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Loan EMI Calculator | तुम्ही होम किंवा कार लोन घेतले आहे किंवा घेणार आहात का? | पहा EMI किती वाढणार

Loan EMI Calculator

Loan EMI Calculator | स्वस्त कर्जाचा जमाना आता संपला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्के वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो रेटचा नवा दर आता 4.40 टक्के झाला आहे. याचा थेट परिणाम त्या ग्राहकांवर होईल जे होम किंवा कार लोन घेण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या ईएमआयचा बोजाही वाढणार आहे. आता रेपो रेट वाढीमुळे ईएमआयचा बोजा किती वाढणार, हा प्रश्न आहे. तेही समजून घेऊ या.

The era of cheap loans is over. The RBI has increased the repo rate by 0.40 percent. This will have a direct impact on home or car loan EMI :

कसं आहे कॅल्क्युलेशन :
समजा तुम्ही २० वर्षांच्या कालावधीसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. सध्या त्यावर तुम्ही 6.8 टक्के दराने व्याज देत असाल तर तुमचा ईएमआय 22,900 रुपये इतका खाली येतो. आता आरबीआयच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर व्याजदर 7.2 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दरमहा २३,६२० रुपये कर्जाचा ईएमआय भरावा लागेल.

पगारदार ग्राहकांसाठी कॅल्क्युलेशन :
या दृष्टीने २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या ग्राहकाच्या ईएमआयमध्ये ७२० रुपयांची वाढ होणार आहे. पगारदार ग्राहकांसाठी हे कॅल्क्युलेशन करण्यात आले आहे. जर तुम्ही रक्कम आणि कालावधी बदललात तर ईएमआयमध्येही फरक पडेल.

०.४०% वाढ :
आज म्हणजे बुधवारी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. रेपो रेट ४.४० टक्के करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढावा बैठकीत आरबीआयने सलग ११ व्यांदा प्रमुख पॉलिसी रेट रेपोमध्ये कोणताही बदल केला नव्हता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loan EMI Calculator to check updated EMI amount after REPO Rate hiked 04 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x