29 April 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Mutual Fund Investment | 5 वर्षात सर्वाधिक रिटर्न देणारे हे आहेत 5 म्युच्युअल फंड | गुंतवणुकीचा विचार करा

Mutual Fund Investment

Mutual Fund Investment | थोडी रिस्क घेता आली तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. खरे तर शेअर बाजाराची माहिती असलेल्या लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. पण म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फंडांची निवड खूप महत्त्वाची असते.

Large Cap Fund, Mid Cap Fund, Small Cap Fund, Flexi-Cap Fund and ELSS are the 5 mutual funds that have given the best returns in the last 5 years :

म्युच्युअल फंडांच्या गर्दीत कोणत्या फंडात गुंतवणूक करायची, यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. तसे पाहिले तर अशा अनेक म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडांना लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, फ्लेक्सी-कॅप फंड आणि ईएलएसएस या श्रेणीत ठेवले जाते. हे असे 5 म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षात उत्तम परतावा दिला आहे.

अॅक्सिस ब्लुचिप फंड (लार्ज-कॅप)
अॅक्सिस म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ब्लू चिप स्टॉक्स किंवा मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सकडे जाते. या म्युच्युअल फंडाने गेल्या 5 वर्षात वार्षिक 23.45 टक्के परतावा दिला आहे. या फंडात तुम्ही 1000 रुपयांचा एसआयपी सुरू करू शकता.

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड (लार्ज-कॅप)
कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाची सुरुवात आठ वर्षांपूर्वी झाली होती. तसेच गेल्या 5 वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. एसआयपीवर गेल्या पाच वर्षांत वार्षिक २२.१४ टक्के परतावा दिला आहे. याचा एयूएम ३,६९१.२५ कोटी रुपये आहे.

पीजीआयएम इंडिया मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंड :
पीजीआयएम इंडिया मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने गेल्या 5 वर्षात एसआयपीवर 33.21% परतावा दिला आहे. याचा एयूएम २,३८३.३८ कोटी रुपयांचा आहे.

अॅक्सिस मिड-कॅप फंड
हा म्युच्युअल फंड अधिक वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. याचा एयूएम १३,८३४.२७ कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षात या फंडाने एसआयपीवर 26.27 टक्के रिटर्न दिला आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
हे स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. थोडी अधिक जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्ही या फंडात गुंतवणूक करू शकता. गेल्या पाच वर्षांत या फंडाने ‘एसआयपी’वर २८.२२ टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mutual Fund Investment for good return in next 5 years check details 08 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x