29 April 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

TTML Share Price | टाटा समूहच्या दिग्गज शेअर मध्ये जबरदस्त पडझड, उच्चांकावरून 62% घसरला स्टॉक

TTML, stock price, fall down, ratan tata,

TTML SHARE PRICE | बाजाराच्या पडझडीच्या काळात सर्व स्टॉक कोसळले, त्यात काही मोठ्या कंपनीच्या स्टॉक चा ही समावेश आहे, असाच एक स्टॉक म्हणजे टाटा समुहमधील दिग्गज कंपनी म्हणजे टीटीएमएल. हा शेअर काही दिवसापूर्वी २९१ रुपये वर ट्रेड करत होता, पण काही ट्रेडिंग सेशन नंतर हा स्टॉक इतका पडला की तो आज २९१ रुपये वरून ११३ रुपयांपर्यंत खाली आला. इतक्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची निराशा नक्कीच वाढली असणार.

एक काळ असा होता जेव्हा जेव्हा गुंतवणूकदार टाटा समूहातील कोणताही स्टॉक असो, डोळे बंद करून त्यात पैसा ओतत होते, पण आता बऱ्याच काळापासून टाटा समूहमधील एक स्टॉक असा आहे जो त्याच्या गुंतवणूकदारांना सतत निराश करत आहे. एकेकाळी जबरदस्त परतावा देणारा टीटीएमएल हा शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून जवळपास ६२ टक्के पडला आहे.

टीटीएमएल शेअर्सची किंमत :
टाटा समूह म्हणजे प्रॉफिट ची गॅरंटी मानला जातो, पण टाटा समूहाचा एक असा शेअर आहे जो त्याच्या गुंतवणूकदारांना सतत निराश करत आहे. एकेकाळी छप्परफाड परतावा देणारा हा शेअर सध्या त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६२% खाली आला आहे ही नक्कीच गुंतवणुकदरासाठी निराश करणारी बातमी आहे. टाटा समूहाचा हा शेअर ११ जानेवारी २०२२ रोजी २९१.०५ रुपये या आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक पातळीला गाठले. या शेअरचे नाव आहे टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लि. म्हणजेच (टीटीएमएल) आहे. सध्या टीटीएमएल शेअर ची किंमत ११३.९५ रुपयांवर आली आहे. मागील शुक्रवारी हा शेअर १.०४% खाली पडला होता. बऱ्याच ट्रेडिंग सेशन पासून हा शेअर नकारात्मक वाढ दाखवत आहे.

शेअर किमतीचा इतिहास :
बाजारातील सर्व वाढ आणि पडझडची नोंद आपल्या शेअर मार्केट कडून ठेवली जाते, जर आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरील उपलब्ध आकडेवारी चे निरीक्षण केले तर त्यानुसार, टी टी एम एल चे शेअर्स गेल्या काही महिन्यांपासून सतत पडत आहेत. गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स ४.६८% पडला होता. मागील एका महिन्यात ह्या स्टॉकने १०.४५% ची नकारात्मक वाढ दाखवली आहे. इतक्या अस्थरीतेच्या वातावरणात देखील सेन्सेक्स २.३२% वाढला आहे पण त्या वाढीला ला स्टॉक सकारात्मक प्रतिसाद देत नाही. या वर्षी टी टी एम एल स्टॉक ची वार्षिक वाढ ४४.९४% ने कमी झाली आहे. या कालावधीत सेन्सेक्सने सुद्धा ७.७१% ची नकारात्मक वाढ दाखवली आहे. तरीही मागील एका वर्षात या स्टॉकची वाढ १५९.८६% एवढी होती आहे. आणि या काळात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर छप्पर फाड परतावा दिला होता. टी टी एम एल ही टाटा समूहातील एक लार्ज कॅप कंपनी आहे म्हणजे त्यांचे भांडवल क्षमता ही खूप मोठी आहे, या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास २२,४३३ कोटी रुपये आहे.

टी टी एम एल कंपनीचा व्यवसाय काय आहे?
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी म्हणून व्यापार करते. ही कंपनी तिच्या क्षेत्रात एक मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. कंपनी व्हॉईस आणि डेटा सेवा पुरवते आणि आपल्या क्षेत्रात सर्वात जास्त मार्केट वर पकड निर्माण केली आहे. कंपनीची ग्राहक यादी बरीच मोठी आहे आणि ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे देखील शमील आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने आपल्या ग्राहक खाजगी कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे. आपल्या ग्राहक कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा पुरवणे हे कंपनीचे प्रमुख काम आहे आणि या नवीन सेवेला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title: TTML Share Price in focus as on 18 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x