4 May 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Axis Mutual Funds | तुमच्यासाठी जबरदस्त फायद्याची म्युच्युअल फंड योजना, दिवसाला फक्त 33 रुपये गुंतवा, लाखोचा परतावा मिळवा

Axis mutual funds

Axis Mutual Funds | सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा एकमेव असा पर्याय आहे ज्यातून भन्नाट परतावा येऊ शकतो. त्याचे दोन जबरदस्त फायदे आहेत. एक फायदा असा की तुम्हाला इक्विटी मार्केटचा फायदा मिळेल. म्हणजेच शेअर बाजार जितका वेगाने वाढेल तितका तुमचा पैसा जास्त पटीने वाढेल. आजपर्यंतचा इतिहास साक्ष आहे की शेअर बाजार कितीही खाली पडला तर त्यापेक्षा जास्त वर येतो. दुसरा फायदा असा आहे की म्युच्युअल फंडातील तोटा होण्याची शक्यता कमी असते, कारण फंड व्यवस्थापक ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे बाजारात गुंतवणूक करतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची शिफारस :
बहुतेक तज्ञ फक्त म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. फक्त गरज आहे तुम्हाला एक चांगली योजना शोधण्याची. उदाहरणार्थ, अशी एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही मासिक 1000 रुपये म्हणजेच सुमारे 33 रुपये प्रतिदिन गुंतवणूक करून 2.77 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता. यात वेळ लागेल पण गुंतवणूकदार मोठा नफा कमावतील एवढं नक्की. योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ

अॅक्सिस ब्लूचिप फंड :
आम्ही ज्या योजनेबद्दल आपल्या माहिती देऊ इच्छतो ती म्हणजे अॅक्सिस ब्लूचिप फंड. अॅक्सिस ब्लूचिप फंड ही अॅक्सिस म्युच्युअल फंडाची योजना आहे. या योजनेने गुंतवणूकदाराना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, या फंडाचा मागील तीन महिन्यांचा परतावा सुमारे 11 टक्के होता. आणि सहा महिन्यांचा एकूण परतावा सुमारे 27 टक्के होता. अँक्सिस ब्लू चीप फंडस् ने गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 135 टक्के इतका भन्नाट परतावा मिळवून दिला आहे.

या फंडात जर तुम्ही फक्त 10,000 रुपये गुंतवले असते तर फक्त 6 महिन्यांत त्याचे 12,717 रुपये झाले असते. हा परतावा 27 टक्के च्या प्रमाणात मोजला आहे. त्याचप्रमाणे, 135 टक्के परताव्याच्या आधारे 5 वर्षांत 10,000 रुपये 23,497 रुपये झाले असते. 10 वर्षात हे पैसे 39,000 रुपयांपेक्षा जास्त झाले असते. अश्याच प्रकारे गुंतवणुकदाराने मासिक आधारावर जमा केलेल्या छोट्या रकमेचे नियमित गुंतवणूक चालू ठेवून 2.77 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळवला असता.

SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्ही अॅक्सिस ब्लूचिप फंडमध्ये 10 वर्षे दरमहा रु 1000 गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक रु. 1.20 लाख झाली असती. आणि त्यावर तुम्हाला 2.77 लाख रुपये परतावा मिळाला असता. म्युच्युअल फंड तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतात, फक्त तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे.

म्युचुअल फंड गुंतवणुकीतून करोडपती कसे व्हाल :
एक गोष्ट आधी लक्षात घ्या की तुम्हाला म्युचुअल फंड गुंतवणूक करून करोडपती होण्यासाठी 30 वर्षे इतका दीर्घ कालावधी लागू शकतो. तुम्ही दर महिन्याला 6000 रुपये ची SIP गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला त्यावर सरासरी वार्षिक 15% परतावा मिळेल. त्या 30 वर्षांत तुमची गुंतवणूक रक्कम रु. 4.2 कोटी होईल. तुम्ही तुमची SIP रक्कम वर्षानुवर्षे वाढवली तर तुम्हाला मिळणारा परतावा आणखी जास्त असेल.

गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम :
जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. काही योजनांमध्ये फक्त 100 रुपये मासिक SIP गुंतवण्याची सुविधा देखील दिली जाते. तुम्ही ही रक्कम कालांतराने हळूहळू वाढवू शकता. किंवा तुम्ही इतर कोणत्याही SIP मध्येही पैसे वाढवून गुंतवणूक सुरू करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axis mutual funds long term investment plan and benefits on 26 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x