3 May 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Multibagger Stocks | 3 धमाकेदार शेअर्स जे आपल्या गुंतवणूकदारांना बनवत आहेत मालामाल, शेअर्स अतिशय तेजीत

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या वातावरणात मागील 7 ट्रेडिंग सेशनमध्ये, तीन शेअर्स कामगिरी पाहून गुंतवणूक आणि तज्ञ ही हैराण झाले आहेत. टाटा समूहाची कंपनी टीटीएमएलने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 35.90 टक्क्यांचा घसघशीत परतावा दिला आहे.

शेअर बाजारातील अस्थिरतेच्या कालावधीत आणि पडझडीचे वातावरणात मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये या तीन लहान शरसानी कमालीची कामगिरी केली आहे. टाटा समूहाची कंपनी टीटीएमएलने या कालावधीत आपल्या भागधारकांना तब्बल 35.90 टक्क्यांचा नफा मिळवून दिला आहे. तोही मंगळवारी जेव्हा शेअरमध्ये 7.46 टक्क्यांची घसरण झाली होती.

त्याचप्रमाणे अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरनेही मागील सात ट्रेडिंग सेशन मध्ये कमाल केला आहे, शेअर्सनी तब्बल 34.66 टक्क्यांची उसळी घेतली आहे. गंमत म्हणजे तोही मंगळवारी 5.79 टक्क्यांनी पडला होता. याशिवाय सुझलॉन एनर्जीने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 32.92 टक्के मजबूत कमाई करून दिली आहे. मंगळवारी शेअर्स मध्ये तब्बल 1.42 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

टाटा टेलिसर्व्हिसेस शेअर : TTML Share Price
मागील एका महिन्यात बीएसईवर ह्या शेअरमध्ये तब्बल 9.87 टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी शेअरची किंमत 122.95 रुपयांवर पोहोचली होती. मागील एका वर्षात ह्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 252 टक्के इतका जोरदार परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत, TTML ने आपल्या भागधारकांना तब्बल 4628 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 2022 वर्षीच्या सुरुवातीला या शेअर्समध्ये पडझड झाली होती,त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यावेळी 40 टक्क्यांहून अधिक तोटा झाला होता.

सुझलॉन एनर्जी शेअर : Suzlon Share Price
मंगळवारी सुझलॉन एनर्जीच्या शेअरची किंमत बीएसईवर 10.71 रुपयांवर पोहोचली होती. या शेअरने आपल्या भागधारकांना मागील एका आठवड्यात 30.93 टक्के आणि एका महिन्यात 43.76 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शेअर्सच्या या वर्षातील आतापर्यंतच्या कामगिरीचे निरीक्षण केल्यास, सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये तब्बल 3.78 टक्के वाढ झाली होती. सुजलोन शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 75.86 टक्के आणि मागील 3 वर्षात 234.69 टक्के इतका धमाकेदार परतावा मिळवून दिला आहे.

रिलायन्स पॉवर शेअर : Reliance Power Share Price
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मागील बऱ्याच दिवसापासून चढ उतार पाहायला मिळत होते. परंतु मंगळवारी BSE वर शेअरमध्ये तब्बल 5.79 टक्क्यांची पडझड झाली आणि शेअर्स 21.95 रुपयांवर जाऊन बंद झाले होते. मात्र, मागील आठवडाभरात त्यात सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. फक्त एका महिन्याच्या कामगिरीचा विचार केला तर, त्यात तब्बल 67 टक्के इतकी जोरदार वाढ झाली आहे. मागील एका वर्षात शेअर्स मध्ये 79 टक्के उलाढाल झाली होती, तर तीन वर्षांत शेअर्सनी 571 टक्के उसळी घेतली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks has risen in short term on 8 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x