26 April 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
x

Electronics Mart India IPO | इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचा IPO लाँच होतोय, इश्यू प्राईस 56 ते 59 रुपये, तपशील जाणून घ्या

Electronics Mart India IPO

Electronics Mart India IPO | 4 ऑक्टोबर 2022 रोजी कंझ्युमर ड्युरेबल्स रिटेल चेन कंपनी “Electronics Mart India” चा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या IPO चा आकार 500 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. Electronics Mart India ने IPO मध्ये प्रति शेअर 56 ते 59 रुपये किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. या IPO मध्ये कंपनी 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. ह्या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल जाहीर केलेला नाही.

IPO तारीख :
Electronics Mart India चा IPO 3 ऑक्टोबर 2022 रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. त्याच वेळी, 12 ऑक्टोबर 2022 रोजी IPO अंतर्गत गुंतवणूक केलेल्या लोकांना शेअर्सचे वितरण केले जाईल. 14 ऑक्टोबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. हा IPO शेअर बाजारात 17 ऑक्टोबरला सूचीबद्ध होऊ शकतो. आनंद राठी फर्म, IIFL सिक्युरिटीज आणि JM Financial ह्यांना या IPO इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

IPO फंड कुठे वापरला जाईल ?
IPO च्या माध्यमातून कंपनीने 500 कोटी रुपये उभारण्याचा प्लॅन तयार केला आहे. यापैकी 111.44 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील. आणि 220 कोटी रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. त्याचबरोबर व्यापारी कर्ज फेडण्यासाठी 55 कोटी रुपयेचा वापर करण्यात येईल.

राखीव स्टॉकचा कोटा :
Electronics Mart India च्या IPO मध्ये 50 टक्के राखीव कोटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात आला आहे. तर 35 टक्के राखीव कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी असेल.र यामध्ये 15 टक्के राखीव कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. 2021-22 मध्ये या कंपनीच्या ऑपरेटिंग उत्पन्नात 36 टक्क्यांची वाढ झाली असून उत्पन्न 434.93 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. याच कालावधीत कंपनीच्या नफ्यात 77 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली असून एकूण नफा 103.89 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

कंपनीचा व्यापार सविस्तर :
या कंपनीचे भारतातली विविध 36 शहरांमध्ये 112 स्टोअर्स आणि आउटलेट उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड म्हणजेच EMIL ची स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी ‘बजाज इलेक्ट्रॉनिक्स’ नावाच्या कस्टमर ड्यूरेबेल वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर म्हणून केली होती. ही कंपनी भारतातील विविध 36 शहरांमध्ये, प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दिल्ली NCR मध्ये 1.12 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाच्या किरकोळ व्यवसाय क्षेत्रामध्ये 112 स्टोअर्स यशस्वीरित्या चालवते आणि त्याचे फायदेशीर व्यवस्थापनही करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Electronics Mart India IPO Will get Open for Investment on 29 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x