4 May 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Penny Stocks | या 34 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना 17 पट परतावा देतोय, स्टॉकचे नाव सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात असे अनेक स्मॉल कॅप पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आणि अनेक दिग्गज गुंतवणूकदारांनी अशा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून अप्रतिम नफा कमावला आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे लक्ष विजय केडिया, राधाकिशन दमानी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर असते. आणि लोकांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते की त्यांच्याकडे कोणते स्टॉक आहेत जे भविष्यात चांगला परतावा देऊ शकतात. डॉली खन्ना ही देखील भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीच्या स्टॉकने मजबूत परतावा दिला आहे.

डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलओ मधील पेनी स्टॉक :
डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलओ मधील पेनी स्टॉक “पॉन्डी ऑक्सिडेस अँड केमिकल लिमिटेड” ने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षांत कमालीचा परतावा कमावून दिला आहे. ह्या स्टॉक ने अप्रतिम परतावा देऊन मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. पॉन्डी ऑक्साइड्स आणि केमिकल्सचे शेअर्स गेल्या आठवड्यात शुक्रवारी BSE निर्देशांकावर 5 टक्क्यांनी पडले होते, आणि दिवसा अखेर 586.05 रुपये किमतीवर क्लोजिंग झाली. चालू वर्ष 2022 मध्ये स्टॉकमध्ये 156 टक्क्यांची वाढ झाली आहे. पॉन्डी ऑक्साइड आणि केमिकल्सच्या स्टॉकमध्ये 2022 ह्या चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 156 टक्क्यांचा जोरदार परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 161.63 टक्के नफा कमावून दिला होता. गेल्या 3 वर्षात या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे पैसे 5 पटीने वाढले आहेत.

2004 मध्ये शेअर्स BSE निर्देशांकावर सूचीबद्ध :
एप्रिल 2004 मध्ये ‘पॉन्डी ऑक्सिडेस आणि केमिकल्स’ चे शेअर्स BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक ज्यावेळी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता, तेव्हा त्याची किंमत फक्त 34.36 रुपये प्रति शेअर होती. सध्या हा स्टॉक 586 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 18 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 17 पट अधिक वाढवले आहेत. कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. बोनस जारी करण्यासाठी कंपनीने 29 सप्टेंबर 2022 रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. 15 जानेवारी 2007 रोजी पॉन्डी ऑक्साइड्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.

जर तुम्ही एप्रिल 2004 मध्ये पॉंडी ऑक्साइड स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाख रुपये पेक्षा अधिक झाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही या शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते, आणि गुंतवणूक कायम ठेवली असती तर तुमची गुंतवणूक 6 पटीने वाढली असती, आणि तुम्हाला 6.50 लाख रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Pondy Oxidase and Chemical Limited share price return on investment on 3 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x