30 April 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

Stock at Low Price | बापरे! 147 रुपयांचा शेअर 23 रुपयांवर आला, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करावा? बोनस शेअर्स मिळत आहेत

Share at Low price

Stock At Low Price | ट्रेडिंग उद्योगाशी संबंधित असलेल्या एका स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना फार मोठा धक्का दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अक्षरशः इतके पडले आहेत की लोकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सध्या ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची तयारी करत आहे. या कंपनीने नुकताच बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे,”डेबॉक इंडस्ट्रीज”. डेबॉक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनीने त्यासाठी रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 89.24 कोटी रुपये आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेली माहिती :
डेबॉक इंडस्ट्रीज या कंपनीने स्टॉक एक्सचेंज सादर केलेल्या फाइलिंगमध्ये स्पष्टीकरण दिले आहे की, “सेबीच्या नियमांनुसार कंपनी नियमकला कळवू इच्छिते की संचालक मंडळाने गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर 2022 ही बोनस शेअर्स वितरीत करण्याची ‘रेकॉर्ड’ तारीख असेल, असे निर्धारित केले आहे. कंपनीने बोनस शेअर्स साठी 1:1 गुणोत्तर निश्चित केले असून कंपनी 3,82,20,000 इक्विटी शेअर्स बोनस शेअर म्हणून मोफत वाटप करणार आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
डेबॉक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे ​​शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावर 23.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही किंमत मागील 22.25 रुपये या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 4.94 टक्के जास्त आहे. या वर्षी या स्टॉक मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे 84 टक्के नुकसान झाले आहे. मागील 5 वर्षात या स्टॉकमध्ये 84.53 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 3 वर्षात हा स्टॉक 84.80 टक्के पडला असून, गेल्या 1 वर्षात स्टॉक 72.15 कमजोर झाला आहे. YTD आधारावर हा स्टॉक 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक 84.12 टक्के कमजोर झाला आहे. हा स्टॉक 147 रुपयांवरून पडून 23 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डेबोक इंडस्ट्रीजमध्ये ज्या कोकणी एक लाखाची गुंतवणूक केली होती त्यांचे पैसे आता 15,000 रुपयांपर्यंत कमी झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Debock Industries Ltd Share at Low price made huge loss for shareholders on 28 October 2022.

हॅशटॅग्स

Share at Low price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x