4 May 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Multibagger IPO | या IPO गुंतवणूकदारांची लॉटरी लागण्याचे संकेत, वाढत्या प्रिमियम GMP ने उत्साह वाढवला, हा तो IPO

Multibagger IPO

Multibagger IPO | पुढील आठवड्यात अनेक नवीन कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत. पण यातही सर्व लोकांच्या नजरा फ्युजन मायक्रोफायनान्स कंपनीच्या IPO वर लागले आहे. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी बंद केला जाईल. म्हणजेच या IPO वर पैसे लावण्यासाठी गुंतवणूकदारांना तीन दिवस देण्यात आले आहे. जर तुम्हीही या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ग्रे मार्केटमधून एक जबरदस्त बातमी आली आहे.

जीएमपी म्हणजे काय?
ग्रे मार्केटचे निरीक्षण करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्या 24 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांचा अंदाज आहे की ही कंपनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजारात एंट्री करेल. त्याच वेळी, 10 नोव्हेंबर 2022 रोजी या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना शेअर्सचे वाटप केले जातील. या कंपनीने आपल्या IPO साठी 350-368 रुपये प्राइस बँड जाहीर केला आहे. जर ग्रे मार्केटमध्ये हा कल असाच सुरू राहिला तर या कंपनीचे शेअर्स 400 रुपये (368+24=392) किमतीवर सूचीबद्ध केले जाऊ शकतात.

शेअर्सची संख्या :
या कंपनीच्या IPO मध्ये 600 कोटी शेअर्स जारी गुंतवणुकीसाठी खुले केले जातील. याव्यतिरिक्त, कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान शेअर धारक 1,36,95,466 शेअर्सची विक्री करतील. नवीन IPO मधून मिळणारे पैसे कंपनी आपले भांडवल खर्च आणि उद्योग वाढवण्यासाठी वापरतील.

OFS मध्ये शेअर्सची विक्री होणार :
कंपनीचे प्रमोटर्स देवेश सचदेव आपल्या एकूण गुंतवणुकीतून 6.50 लाख शेअर्स विकतील. दुसरीकडे, मिनी सचदेव आपल्या गुंतवणूकीतून 1 लाख शेअर्स विक्री करणार आहे. हनी रोज इन्व्हेस्टमेंट आणि क्रिएशन इन्व्हेस्टमेंट फ्यूजन आपले 14 लाख शेअर्स विक्रीसाठी खुले करणार आहेत. इतर लहान भागधारकांमध्ये Oikocredit Equitable Development Cooperative Society UA आपले 66,06,375 शेअर्स विक्री करणार आहे. ग्लोबल इम्पॅक्ट फंड SCA Sikar कंपनी 35,39,091 शेअर्स OFS मध्ये विक्री करणार आहे. हनी रोज इन्व्हेस्टमेंट कंपनीची फ्युजन मायक्रोफायनान्स या कंपनीत 48.65 टक्के गुंतवणूक वाटा आहे. क्रिएशन इन्व्हेस्टमेंट फ्यूजन ही एक पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापन करणारी कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of Fusion microfinance Company share price in gray Market on 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x