3 May 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Stock in Focus | नायका आणि पेटीएमची अग्नीपरिक्षा, स्टॉकचे 'सेफ्टी कवच' काढले जाणार, काय परिमाण होणार पहा

Stock in Focus

Stock in Focus | पेटीएम आणि नायकाचे IPO बाजारात आले, पण अपेक्षेप्रमाणे कमाल करु शकले नाही. या दोन्ही कंपनीच्या IPO ने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती. या कंपन्यांची खरी अग्निपरीक्षा या महिन्यात होणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये Nykaa आणि Paytm/One 97 Communications Ltd कंपनीचा लॉक इन कालावधी संपणार आहे. म्हणजेच या कालमर्यादेनंतर अनेक मोठे गुंतवणूकदार या दोन्ही कंपनीमधून आपली गुंतवणूक विकून बाहेर पडू शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या दोन्ही कंपनीचा सुमारे 14 अब्ज डॉलर्स किमतीच्या शेअर्सचा लॉक-इन कालावधी या महिन्यात संपणार आहे.

पेटीएमने दिला धक्का :
अलीकडे ज्या टेक कंपन्यांनी आपले IPO बाजारात आणले होते, त्यापैकी पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घट पाहायला मिळाली आहे. Paytm चा IPO आल्यापासून या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 70 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. Sons Soft Group Corporation, वॉरन बफे यांची Berkshire Hathaway Inc आणि जॅक मा यांची Ant Group Co यांसारख्या कंपन्यांची Paytm कंपनीत गुंतवणूक आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी Paytm कंपनीच्या शेअर्सवर सर्वात जास्त विक्रीचा दबाव पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दिवशी सुमारे 4.3 अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स अनलॉक केले जाणार असल्याने स्टॉक मध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव दिसून येऊ शकतो. मोठे गुंतवणुकदार आपली गुंतवणूक 15 नोव्हेंबरनंतर विकून बाहेर पडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, लॉक-इन कालावधी संपल्यानंतरही नायका कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वधू शकतो. मागील एका महिन्यात नायका कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. नायका कंपनीच्या शेअरचा लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी संपणार आहे, त्यामुळे या स्टॉक वर लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.

लॉक-इन कालावधी संपल्यानंतर होणार परिणाम :
नायका आणि पेटीएम कंपनीच्या शेअर्सबद्दल असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, लॉक इन कालावधी संपल्यावर कंपनीतील मोठे गुंतवणुकदार आपली गुंतवून विकून बाहेर पडतील. कारण असेच काहीतरी Zomato चा लॉक इन कालावधी संपल्यावर दिसून आले होते. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर, झोमॅटोमधील सुरुवातीचे गुंतवणूकदार उबेर टेक्नॉलॉजीने आपला मोठा हिस्सा विकला होता. त्यानंतर Zomato चे शेअर्स जबरदस्त पडले होते. मात्र, त्यांनतर Zomato च्या स्टॉकमध्ये बरीच सुधारणा पाहायला मिळाली आहे. ऑगस्ट 2022 पासून Zomato चा स्टॉक 13 टक्के वर गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa and Paytm Stock in Focus of Stock market expert because of expiry of lock in period soon 08 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x