3 May 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

Money from IPO | आयपीओ अलर्ट! पुढच्या आठवड्यात 4 IPO बाजारात येणार आहेत, कमाईची संधी

Money From IPO

Money from IPO | शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना बंपर कमाईची संधी मिळणार आहे. या आठवड्यात 4 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत. या 4 कंपनीच्या IPO च्या माध्यमातून 5000 कोटी रुपये उभारण्याचे प्रयत्न केले जातील. 2022 मध्ये शेअर बाजाराची कामगिरी डगमगलेली राहिली आहे. अशा परिस्थितीत आयपीओ मध्ये गुंतवणुक करून लोकांना कमाईची संधी मिळणार आहे. भारतीय शेअर बाजाराचे मूलभूत तत्त्वेही मजबूत असून तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करून कमाई करू शकता चार जबरदस्त IPO बाजारात येणार आहेत, त्यासाठी बँकेत पैसे तयार ठेवा.

या 4 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत :
या आठवड्यात 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान चार नवीन कंपनी आपले IPO गुंतवणुकीसाठी खुले करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज, फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स, केनेस टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी. आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज आणि फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स कंपनीचे IPO 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022 गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत. Kaynes Technology India आणि Inox Green Energy चे IPO 10 आणि 11 नोव्हेंबर 2022 गुंतवणुकीसाठी खुले जाणार आहेत. हे IPO 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकिसाठी खुले राहतील.

IPO चे तपशील थोडक्यात :
फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स :
या कंपनी IPO साठी प्रति शेअर 450-474 रुपये किंमत बँड जाहीर केला आहे. IPO च्या माध्यमातून ही कंपनी शेअर बाजारातून 1,960 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करेल. कंपनीने हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत बाजारात आणला आहे. ही कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असून ती लहान व्यवसाय आणि उद्योगांना लघु आणि मध्यम कर्ज उपलब्ध करून देते.

आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज :
या कंपनीचा IPO इश्यू आकार 1462 कोटी असेल. या IPO मध्ये कंपनी 805 कोटी रुपयेचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये कंपनी 1.61 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात जारी करेल. IPO मध्ये कंपनीने प्रति शेअर किंमत 386-407 रुपये जाहीर केली आहे. आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज ही कंपनी एक अग्रणी स्पेशालिटी मरीन केमिकल मॅन्युफॅक्चरर म्हणून प्रसिद्ध आहे.

केनेस टेक्नॉलॉजी :
ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून खुल्या बाजारातून 858 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. IPO मध्ये शेअरची किंमत बँड प्रति शेअर 559-587 रुपये जाहीर करण्यात आली आहे. केनेस टेक्नॉलॉजी IoT सोल्यूशन्स सक्षम इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे.

आयनॉक्स विंड एनर्जी :
ही कंपनी हरित ऊर्जा क्षेत्रात उद्योग व्यवसाय करते. INOX ग्रीन एनर्जी कंपनी खुल्या बाजारातून IPO द्वारे 740 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही कंपनी आयनॉक्स विंड या कंपनीची उपकंपनी आहे.

मागील आठवड्यात अनेक आयपीओ बाजारात सूचीबद्ध झाले होते. गेल्या आठवड्यात 4 नवीन कंपनीचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते. या कंपन्यांमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल, ग्लोबल हेल्थ, डीसीएक्स सिस्टम्स आणि फ्युजन मायक्रो फायनान्स अशा कंपनीचे नाव आहे. DCX Systems कंपनीच्या IPO ला चांगला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला होता, आणि हा IPO 70 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Four new IPO is going to open next week for investment to earn Money From IPO on 09 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x