4 May 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

NDTV Share Price | अदानी श्रीमंत होतं आहेत, तुम्ही कशाला गरीब राहता, एनडीटीव्हीचे शेअर सुसाट तेजीत, स्टॉक खरेदी करा

NDTV share price

NDTV Share Price | भारतातील प्रसिद्ध मीडिया कंपनी NDTV च्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर लागून 383.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक जवळपास 4 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. NDTV कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे हे एक प्रमुख कारण म्हणजे स्टॉक मार्केट नियामक SEBI ने सोमवारी NDTV मधील 26 टक्के शेअर्स ओपन ऑफरद्वारे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. NDTV कंपनीच्या शेअर्सची ही Open Buying Offer 22 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल आणि 5 डिसेंबर 2022 रोजी बंद होईल .

अदानी समुहाचे NDTV शी कनेक्शन :
अदानी समूहाने ऑगस्ट 20220मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड/VCPL कंपनी खरेदी केली. या VCPL कंपनीने 10 वर्षापूर्वी NDTV कंपनीच्या संस्थापकांना शेअर वॉरंटवर 403 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते. NDTV चे संस्थापक VCPL कंपनीला कर्जाची परतफेड करू शकले नाही, त्यामुळे NDTV मीडिया समूहातील 29.18 टक्के भागभांडवल विकत घेण्याची परवानगी VCPL कंपनीला मिळाली. या माध्यमातून अदानी समूहाने VCPL कंपनी खरेदी केली जिला कर्जाच्या बदली एनडीटीव्हीचे 29.18 शेअर्स मिळाले होते. VCPL अदानी समूहाच्या मालकीची झाल्यामुळे NDTV चे 29.18 टक्के शेअर्स अदानीकडे गेले. आता अदानी समूह ओपन ऑफर अंतर्गत NDTV चे अधिग्रहण करू पाहत आहे. या ओपन ऑफरमध्ये कंपनीच्या विद्यमान शेअर धारकांना सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा अधिक किंमत ऑफर करून कंपनीचे शेअर्स अधिग्रहण केले जातात आणि कंपनीमध्ये आपले स्टेक वाढवले जातात.

NDTV कंपनीच्या शेअर्स 2022 या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना YTD आधारे 233.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या काळात NDTV कंपनीचा शेअर 114.94 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 383.05 रुपयांवर गेला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 365.15 टक्के नफा मिळवून दिला होता. हा स्टॉक एके काळी 82.35 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता शेअर 450 रुपयेच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| NDTV share price has increased after the News announced of Open Buying office by Adani group on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#NDTV Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x