26 April 2024 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

Gold Price Today | अरे वा! आज सोने चांदीच्या दरात घसरण, पाहा लेटेस्ट रेट

Gold Price Today

Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) ०.२५ टक्क्यांनी कमी व्यापार करत आहे. काल एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.59 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. त्याचबरोबर एमसीएक्सवर चांदीच्या दरात आज 0.71 टक्क्यांची घसरण झाली आहे. काल वायदे बाजारात चांदीचा दरही 0.70 टक्क्यांनी वधारुन बंद झाला.

गुरुवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 9:10 वाजेपर्यंत 131 रुपयांनी कमी होऊन 52,931 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता. सोन्याचा भाव आज ५२,९५० रुपयांवर खुला झाला. उघडल्यानंतरच तो आणखी कमजोर झाला आणि किंमत ५२,९३१ रुपये झाली. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर चांदीचे भावही लाल निशाणीत ट्रेड करत आहेत. आज चांदीचा दर 443 रुपयांनी कमी होऊन 61,554 रुपयांवर ट्रेड करत आहे. चांदीचा भाव ६१,७६० रुपयांवर खुला झाला. एकदा हा भाव ६२,७७० रुपयांपर्यंत गेला होता. पण नंतर हा भाव किंचित कमी होऊन ६१,५५४ रुपये झाला.

सराफा बाजारात सोने वाढले
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याचे दर 320 रुपयांनी वाढून 53,449 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. मंगळवारच्या व्यापारात हा मौल्यवान धातू ५३,१२९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचे दर 125 रुपयांनी कमी होऊन 62,682 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट तज्ज्ञांनी सांगितले की, देशांतर्गत स्पॉटची चांगली मागणी, कमकुवत झालेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली वाढ यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीचे दर कमकुवत आहेत. काल सोने वधारले होते, तर चांदीचे भाव उतरले होते. सोन्याचा स्पॉट भाव आज ०.९३ टक्क्यांनी घसरून १,७६४.४२ डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 1.36 टक्क्यांनी घसरून 21.31 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x