29 April 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती

Highlights:

  • PPF Calculator
  • व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम करमुक्त
  • किमान आणि कमाल गुंतवणूक
  • 1,000 रुपयेवर 18 लाख परतावा कमवा
PPF Calculator

PPF Calculator | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जिला आपण PPF म्हणूनही ओळखतो, ही एक अतिशय सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक योजना म्हणून नावाजली आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, कारण ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही, म्हणजेच शेअर बाजारातील चढ-उतारांचा योजनेतील गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही.

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदाराना कर सवलत देखील दिली जाते. एवढेच नाही तर गुंतवणुकीवर जो व्याज मिळतो, त्या रकमेवर आणि मुदतपूर्तीच्या रकमेवर कोणताही आयकर भरावा लागत नाही. PPF मधील ठेवींवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते.

व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम करमुक्त

यामध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कमही करमुक्त करण्यात आली आहे. पीपीएफ योजनेमधील गुंतवणुकीवर भारत सरकार सुरक्षेची हमी देते. पीपीएफ खात्यात एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. तुम्ही मासिक किंवा वार्षिक आधारावर कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.

किमान आणि कमाल गुंतवणूक

तुम्ही या योजनेत वार्षिक किमान 500 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या पीपीएफ योजनेवर गुंतवणुकदारांना 7.1 टक्के व्याज दराने परतावा दिला जातो. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी केंद्र सरकारने पीपीएफ योजनेचा व्याजदर 7.1 टक्के स्थिर ठेवला आहे. PPF योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारे 7.1 टक्के व्याज हे अनेक बँकांच्या FD व्याज दरापेक्षा अनेक पट चांगले आहे.

गुंतवणूकदार एका PPF खात्यात कमाल 15 वर्षे सतत गुंतवणूक जमा करू शकतात. आणि जर गुंतवणूकदाराला अडचणीच्या वेळी पैशाची आवश्यकता असेल तर तो या रकमेवर कर्ज ही कधी शकतो. योजनेचा कालावधी 5-5 वर्षांच्या ब्लॉक कालावधीसाठी वाढवता येतो. यासाठी मुदत वाढीचा अर्ज सादर करावा लागतो.

1,000 रुपयेवर 18 लाख परतावा कमवा

जर समजा एखादा गुंतवणुकदार आपल्या PPF खात्यात दरमहा 1,000 रुपये गुंतवणूक करतो. एका वर्षात त्याच्या PPF खात्यात 12,000 रुपये जमा होतील. समजा त्या व्यक्तीचे सध्याचे वय 25 वर्ष असून त्याने वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत म्हणजेच पुढील 35 वर्षांपर्यंत पीपीएफ खात्यात 1,000 जमा केले तर योजनेच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच तो व्यक्ती निवृत्त होताना त्याला 18.14 लाख रुपये परतावा मिळेल.

या योजनेत मिळणारा परतावा आणि मुदतपूर्ती रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल. एवढ्या वर्षात त्या व्यक्तीची प्रत्यक्ष गुंतवणूक 4.20 लाख रुपये असेल आणि त्याला 14 लाख रुपये व्याज परतावा म्हणून मिळेल.

सरकारने या तिमाहीत पीपीएफ आणि इतर अल्प बचत योजनांवरील व्याजदर आहे तसेच ठेवले आहेत त्यात कोणताही बदल केला नाही. या तिमाहीत योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात RBI कडून सादर करण्यात येणार्‍या पतधोरणात रेपो दरात पुन्हा वाढ केली जाऊ शकते. अशा स्थितीत अल्पबचत योजनांचे व्याजदरही वाढतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Calculator for Understanding Return on long term investment on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x